शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
5
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
6
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
7
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
8
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
9
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
10
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
11
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
12
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
13
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
15
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
16
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
17
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
18
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
19
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
20
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या

वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा उपयोग पशु-पक्ष्यांसाठी व्हावा

By admin | Updated: August 6, 2016 02:47 IST

वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करून अनेकजण हे फोटो फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर टाकतात. याचा त्या प्राण्यांच्या

नागपूर : वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करून अनेकजण हे फोटो फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपवर टाकतात. याचा त्या प्राण्यांच्या हितासाठी काहीच उपयोग होत नाही. अशा फोटोवर संशोधन होऊन हे संशोधन त्या प्राण्यांच्या हितासाठी व्हायला हवे. संशोधनातून पुढे आलेला पेपर सोशल मीडियात वापरावा, असे प्रतिपादन भारतातील पहिला संशोधक छायाचित्रकार आणि मूळचा नागपुरातील रहिवासी प्रसेनजित यादव याने पत्रकार परिषदेत केले. आयडीयाज (इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट थ्रु एक्स्पोजर टू अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस्) च्या वतीने चिटणवीस सेंटरच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत प्रसेनजित म्हणाला, बालपण शेतात गेल्यामुळे निसर्गाचे सान्निध्य लाभले. हिस्लॉपमधून बायोटेक्नोलॉजीमधून झुलॉजी विषयात पदवी प्राप्त केली. दरम्यान वनसंरक्षण व रेस्क्यु आॅपरेशनमध्ये सहभागी व्हायचो. मॉलेक्युलर बायोलॉजीच्या क्षमतेबद्दल माहिती मिळाल्यानंतर या विषयाची पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड केली. अ‍ॅक्टिव्ह रिसर्चमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. मोठे कार्निव्होर जेनेटिक्स आणि फॉरेन्सिक फॉर बायोलॉजीकल सायन्समध्ये काम सुरू केले. मांसाहारी प्राण्यांच्या संख्येची घनता, विभाजन, गुंतागुंत याबाबतचे हे काम होते. दरम्यान कॅट स्पेसिफिक जेनेटिक मार्कर्स विकसित केले. त्याचा आता जगात वापर होत आहे. तस्करी झालेल्या बिबट्याच्या शरीरातील भागांचे भौगोलिक मूळ शोधण्याची यंत्रणा विकसित करण्यासाठी मदत केली. हे दोन्ही प्रकल्प जागतिक जर्नल्समध्ये प्रकाशित होऊन शास्त्रज्ञांसाठी ते उपलब्ध आहेत. परंतु शैक्षणिक प्रकल्प प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे आहेत. त्याने जनजागृती होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मी सायन्स कम्युनिकेशनच्या दिशेने वळलो. संरक्षण बंद दाराआड होऊ शकत नसल्याचे लक्षात आल्यामुळे फोटोग्राफीच्या माध्यमातून संरक्षणाचा संदेश देण्याचे ठरविले. संशोधक, संरक्षणकर्ते, व्यवस्थापकांसोबत पर्यावरण, विज्ञान, संरक्षणाच्या कथा दृकमाध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविल्या. हिमालयात बदलत्या पर्यावरणाचा परिणाम यावर संशोधन केले. दक्षिण भारतात ब्रह्मगिरीच्या पर्वतात सर्वात लहान बेडूक शोधून काढला. प्रसेनजितचा नॅशनल जिओग्राफिकसाठीचा चित्रपट आगामी दीड वर्षात प्रदर्शित होत आहे. फोटोग्राफीचे स्टँडर्ड जगाला दाखविण्याचा त्याचा मानस आहे. आजपर्यंत महाराष्ट्र, भारतातील अनेक वन्यप्राण्यांची माहिती त्याने जगातील इतर देशांना पुरविली. त्याच्या संशोधनाचे, छायाचित्रांचे नॅशनल जिओग्राफिकने कौतुक केले. वैज्ञानिक आणि फोटोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाहणाऱ्याच्या मनात कुतुहल निर्माण करण्याची त्याची इच्छा आहे. आजपर्यंत अनेक पुरस्कार प्रसेनजितला मिळाले असून जगभरात त्याच्या कामाचे कौतुक होत आहे. पत्रकार परिषदेला उधमसिंग यादव, साधना यादव उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)