शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी पटवून दिले रानभाज्यांचे महत्त्व, तयार केले विविध प्रकारचे पदार्थ

By आनंद डेकाटे | Updated: July 21, 2023 17:06 IST

नागपूर विद्यापीठात रानभाजी महोत्सव

नागपूर : आपल्या सभोवताल आढळणाऱ्या रानभाज्यांमध्ये विविध प्रकारचे औषधीय गुण आढळून येते. रानभाज्यांचे पावडर करीत कॅप्सूल स्वरूपात अत्यंत महागड्या दरांमध्ये विक्री केली जाते. मात्र त्या ऐवजी नैसर्गिक रानभाज्यांचे सेवन केल्यास फायदेशीर ठरते. रानभाज्यांचे हेच महत्तव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठातील गृहविज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी पटवून दिले. निमित्त हाेते. रानभाजी महोत्सवाचे. शुक्रवारी आयोजित या महोत्सवात स्वत: विद्यार्थ्यांनी अत्यंत मेहनतीने या रानभाज्यांपासून विविध प्रकारचे पदार्थ तयार केले होते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव वर्षाच्या निमित्ताने गृहविज्ञान विभागात शुक्रवारी रानभाजी एक्स्पोचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. गृहविज्ञान विभागाच्या सभागृहात आयोजित महोत्सवात एकूण २७ रानभाज्यांचे महत्त्व विषद करणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. ताज्या भाज्या, सुकवलेल्या भाज्या, पावडर, त्याचे विविध प्रकारचे पदार्थ, चटण्या, उत्तप्पा, भाकर, पोळी आदी वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या.

तरोटा, खापरखुटी, पातूर, अरदफरी, चिंचेचे पान, शेवगा, आघाडा, लाल भाजी, चिवळ, मुळ्याची पाने, फुलगोभीची पाने, घोळभाजी, तांदुजा अशा विविध वनस्पतींचा समावेश होता. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, गृह विज्ञान प्रमुख डॉ. कल्पना जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.

- रानभाज्यांमधील रोगप्रतिकारक पोषकतत्व संशोधनातून शोधून काढा

विविध आजारांवर रामबाण असलेल्या रानभाज्यांमधील रोगप्रतिकारक पोषकतत्व संशोधनातून शोधून काढा, असे आवाहन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी प्रदर्शनाची पाहणी करताना केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठvegetableभाज्याuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीnagpurनागपूर