शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

डुक्कर आडवे गेले अन् घडला भीषण अपघात : भरधाव कार ट्रकवर आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:20 IST

डुक्कर मध्येच आडवे गेल्याने चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित कार रोडवरील ट्रकवर मागून धडकली. त्यात दोघांचा मृत्यू झाला असून, चौघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर महामार्ग क्रमांक - ७ वरील पवनी शिवारात बुधवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदोघांचा मृत्यू, चौघे जखमी नागपूर - जबलपूर महामार्ग क्रमांक - ७ वरील पवनी येथील दुर्दैवी घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (देवलापार) : डुक्कर मध्येच आडवे गेल्याने चालकाचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित कार रोडवरील ट्रकवर मागून धडकली. त्यात दोघांचा मृत्यू झाला असून, चौघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. ही घटना देवलापार (ता. रामटेक) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर - जबलपूर महामार्ग क्रमांक - ७ वरील पवनी शिवारात बुधवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली.रामकिशन देवीलाल डहरवाल (५२) व काव्यसिंग अजय डहरवाल (३ महिने) अशी मृतांची तर रोशनी अजय डहरवाल (२५), दीप्ती गोविंद डहरवाल, गोविंद डहरवाल व पिहू गोविंद डहरवाल, सर्व रा. जिल्हापूर, ता. कुरई, जिल्हा शिवनी, मध्य प्रदेश अशी जखमींची नावे आहेत. काव्यसिंग हा आजारी असल्याने हे सर्व जण त्याच्या उपचारासाठी एमएच-४९/एएस-३७४९ क्रमांकाच्या कारने नागपूरला जात होते. या मार्गावरील पवनी शिवारात असलेल्या चिंदई माता मंदिराजवळ कारला डुक्कर आडवे गेले. त्यामुळे चालक अशफाक शब्बीर खान याचा कारवरील ताबा सुटला आणि अनियंत्रित कार समोर असलेल्या ट्रकवर मागून धडकली.त्यात कारच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला असून, कारमधील काव्यसिंग व रामकिशन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शिवाय, अन्य चौघे गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले व जखमींसह मृतदेह देवलापार येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नागपूरला रवाना केले. शिवाय, दोन्ही मृतदेहांवर उत्तरीय तपासणी करून ते कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी देवलापार पोलिसांनी कारचालक अशफाक याच्या विरुद्ध भादंवि २७९, ३३७, ३३८, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू