वीज बिलासाठी पत्नीचे डाेके फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:11 IST2021-08-28T04:11:58+5:302021-08-28T04:11:58+5:30

-------------------घरफोडी करणारे अटकेत नागपूर : घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना कळमना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. आकाश ऊर्फ बोंडा अजय भोयर ...

Wife's right hand broke for electricity bill | वीज बिलासाठी पत्नीचे डाेके फोडले

वीज बिलासाठी पत्नीचे डाेके फोडले

-------------------घरफोडी करणारे अटकेत

नागपूर : घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना कळमना पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

आकाश ऊर्फ बोंडा अजय भोयर (१९) रा. नवकन्यानगर आणि गणू उत्तम साहू (२०) रा. दुर्गानगर अशी आरोपीची नावे आहेत. भोलेश्वरनगर येथील महेश वर्मा हे १८ ऑगस्ट रोजी सासुरवाडीला गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील राेख रक्कम व दागिने चोरून नेले. कळमना पोलीस गस्त घालत असताना आरोपी त्यांना सापडले. विचारपूस केली तेव्हा त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली.

--------------------

सव्वा लाखाचे दागिने चोरीला

नागपूर : कोराडी येथे एका घरातून चोरट्यांनी सव्वा लाखाचे दागिने चोरून नेले. ओमनगर येथील शाेभा यशवंत ढोके या २६ ऑगस्ट रोजी सकाळी ड्युटीवर गेल्या होत्या. त्यांच्या गेल्यानंतर दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने लंपास केले. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Wife's right hand broke for electricity bill