पत्नीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:07 IST2021-04-05T04:07:47+5:302021-04-05T04:07:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पत्नीसोबत पटत नसल्यामुळे नवरोबाने तिला बदनाम करण्यासाठी तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर ...

पत्नीचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीसोबत पटत नसल्यामुळे नवरोबाने तिला बदनाम करण्यासाठी तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. हा संतापजनक प्रकार लक्षात आल्यानंतर पत्नीने यशोधरानगर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार नोंदवली. सुरेश लक्ष्मीचंद सुमन (वय ३७) असे आरोपी नवरोबाचे नाव असून तो राजस्थानमधील कोटा येथे राहतो.
२५ वर्षीय पत्नीसोबत त्याचे पटेनासे झाले होते. त्यामुळे पत्नी नागपुरात राहायला आली. आरोपीने १७ जानेवारी ते ३ एप्रिलदरम्यान मित्राच्या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करून त्यावर स्वतःच्या पत्नीचे अश्लील मेसेज आणि व्हिडीओ अपलोड केले. सोबत, पत्नीच्या मित्रमैत्रिणींचे फोटोही टाकले. हा धक्कादायक प्रकार लक्षात आल्यानंतर पत्नीने शनिवारी यशोधरानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली सुरेश सुमन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---