शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून पतीनं पत्नीवर गोळी झाडून केली हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 07:58 IST

घरगुती वादातून पतीनं पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देस्वत:वरही आरोपी पतीने झाडली गोळी : कर्जबाजारीपणामुळे झालेल्या कोंडीतून थरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरगुती वादातून पतीनं पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. नागपुरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. येथील एका प्लायवूड व्यापा-याने पत्नीवर गोळी झाडून तिची हत्या आणि यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी (11सप्टेंबर) रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. दोघांनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. रवी नागपुरे आणि मीना नागपुरे असे या दाम्पत्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  मीनाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, रवीची प्रकृती गंभीर आहे.

मानेवाड्यात प्लायवूडचे शॉप चालवणारा रवी नागपुरे (वय ४८) कर्जबाजारीपणामुळे आर्थिक कोंडीत सापडला होता. त्यामुळे तो सक्करदरातील दत्तात्रय नगरात सर्वश्री मंदिराजवळ एका भाड्याच्या घरात पत्नी मीना (वय ४५) सोबत राहत होता. आर्थिक कोंडीमुळे त्यांच्यात महिनाभरापासून वाद सुरू होते. पोळ्यासारखा सण असताना आर्थिक चणचणीमुळे मनासारखे काही करता आले नाही म्हणून रवी आणि मीनामध्ये वाद झाला. मंगळवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास या वादानं टोक गाठलं आणि रवीने पिस्तुलातून मीनावर गोळी झाडली. ती रक्ताच्या थारोळळ्यात कोसळल्यानंतर स्वत:वरही गोळी मारून घेतली.

दरम्यान, गोळीबाराचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी रवीच्या घराकडे धावली. रवी आणि मीना रक्ताच्या थारोळळ्यात पडून होते. शेजारी पिस्तुल पाहिल्यानंतर त्यांनी तातडीनं सक्करदरा पोलिसांना संपर्क साधला. त्यामुळे सक्करदराचा पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. तत्पूर्वीच जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी मीनाला मृत घोषित केले.

पिस्तुल कुठून आणले ?दरम्यान, या घटनेमुळे उपराजधानीत खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त नीलेश भरणे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आजुबाजूच्यांकडून घटनेची माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न चालविले.  रवी नागपुरे हा प्लायवूडचा व्यापारी होता. यामुळे त्याच्याकडे पिस्तुल आले कुठून?, याचा शोध पोलीस घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनnagpurनागपूरSuicideआत्महत्या