पत्नीनं केली पतीची गळा दाबून हत्या

By Admin | Updated: May 16, 2017 15:51 IST2017-05-16T15:51:16+5:302017-05-16T15:51:16+5:30

अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या करून तो अपघाताने मेल्याचा बनाव रचणा-या स्वाती नायर (वय २५) नामक महिलेविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला

Wife murdered husband by pressing her husband | पत्नीनं केली पतीची गळा दाबून हत्या

पत्नीनं केली पतीची गळा दाबून हत्या

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 16 - अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीची हत्या करून तो अपघाताने मेल्याचा बनाव रचणा-या स्वाती नायर (वय २५) नामक महिलेविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. नितीन नायर (वय २७) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वातीचं पहिले लग्न झाले अन् काडीमोडही झाला. त्यानंतर नितीनसोबत तिचे दुसरे लग्न झाले होते. नितीनने काही वर्षांपूर्वी भोपाळला टायरचे शोरूम सुरू केले आणि तो पत्नीसह तेथेच राहू लागला. 
 
औषधोपचाराच्या निमित्ताने नितीन आणि स्वाती नागपुरात आले होते. २९ एप्रिलला रात्री १० ते १०. ३० च्या सुमारास नितीनचा पायरीवरून पडल्याने मृत्यू झाल्याचा स्वातीने कांगावा केला होता. बजाजनगर पोलिसांनाही तशी माहिती दिली होती.
 
पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात त्याचा गळा दाबून हत्या झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. नितीनचा भाऊ हरगोविंद नायर (वय २५) यानेही पोलिसांना स्वातीच्या प्रेमप्रकरणाचा उलगडा करणारे काही पुरावे दिले. त्यावरून ठाणेदार  सुधीर नंदनवार यांनी स्वाती विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला.
 
पोलीस पथक केरळकडे
नितीनचा खाली पडून मृत्यू झाल्याचा कांगावा करणारी स्वाती त्याच्या अंत्यसंस्कारानंतर लगेच आईवडीलांसोबत केरळला निघून गेली. धडधाकट नव-याचा तिने एकटीने गळा कसा दाबला, नितीनने तिचा प्रतिकार का केला नाही, की यावेळी स्वातीसोबत दुसरा कोणता आरोपी होता, आदी प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी पोलीस स्वातीला अटक करण्यासाठी केरळकडे निघाले आहे.

Web Title: Wife murdered husband by pressing her husband