ट्रकच्या धडकेत पत्नी ठार, पती जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:08 IST2021-09-24T04:08:43+5:302021-09-24T04:08:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नातेवाइकाची प्रकृती बघायला जात असलेल्या एका दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक मारली. ...

Wife killed, husband injured in truck crash | ट्रकच्या धडकेत पत्नी ठार, पती जखमी

ट्रकच्या धडकेत पत्नी ठार, पती जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नातेवाइकाची प्रकृती बघायला जात असलेल्या एका दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक मारली. त्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

मंजू सुरेश रंगारी (५०) असे मृत महिलेचे तर जखमी व्यक्तीचे नाव सुरेश रंगारी आहे. नवीन मंगळवारी, मेहंदीबाग मार्गावर त्यांचे निवासस्थान आहे. सावनेरला राहणारे संजय बोरकर यांच्या पत्नीची तब्येत खराब असल्याने त्यांना बघण्यासाठी संजयचे मामा सुरेश रंगारी त्यांची पत्नी मंजूला घेऊन दुचाकीवर बुधवारी दुपारी निघाले. कामगार नगर चाैकातून कपिलनगर चाैकाकडे जात असताना भरधाव ट्रकचालकाने त्यांना जोरदार धडक मारली. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण झाले. ते पाहून आरोपी ट्रकचालक, वाहक पळून गेले. माहिती कळताच कपिलनगर पोलीस घटनास्थळी धावले. दरम्यान, जखमी रंगारी दाम्पत्याला मेयोत नेले असता डॉक्टरांनी मंजू यांना मृत घोषित केले. सुरेश रंगारी यांचे बयान नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याची चाैकशी केली जात आहे.

----

Web Title: Wife killed, husband injured in truck crash