नवरा दारू पिल्याचे पाहून पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:09 IST2020-12-22T04:09:01+5:302020-12-22T04:09:01+5:30

रोहिणी श्रीकांत वालदे (वय ३९) असे मृत महिलेचे नाव असून ती झिंगाबाई टाकळीतील राऊत ले-आऊटमध्ये राहत होती. रोहिणीचे पती ...

Wife commits suicide after drinking alcohol | नवरा दारू पिल्याचे पाहून पत्नीची आत्महत्या

नवरा दारू पिल्याचे पाहून पत्नीची आत्महत्या

रोहिणी श्रीकांत वालदे (वय ३९) असे मृत महिलेचे नाव असून ती झिंगाबाई टाकळीतील राऊत ले-आऊटमध्ये राहत होती. रोहिणीचे पती श्रीकांत गोपीचंद वालदे वीज मंडळात कार्यरत आहेत. त्यांना १३ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा आहे. प्राथमिक चौकशीत पुढे आलेल्या माहितीनुसार, वालदे आधी खूप दारू प्यायचे. त्यामुळे पती-पत्नीत नेहमी वाद होत होते. पाच महिन्यांपूर्वी श्रीकांत यांनी दारू सोडल्याने घरात सर्व व्यवस्थित होते. अचानक रविवारी वालदे दारू पिऊन घरी आल्याने रोहिणी संतापली. पती-पत्नीत वाद झाल्यानंतर रागाच्या भरात रोहिणीने घरात उंदीर मारण्याचे औषध घेतले. तिला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा जीव वाचू शकला नाही. वालदे यांच्या तक्रारीवरून मानकापूरचे पीएसआय मगर यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

----

Web Title: Wife commits suicide after drinking alcohol