एकत्र जेवण्यास नकार दिल्याने पत्नीस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:12 IST2021-09-14T04:12:07+5:302021-09-14T04:12:07+5:30

माैदा : एकाच ताटात एकत्र जेवण्यास नकार दिल्यावरून आराेपी पतीने त्याच्या पत्नीस मारहाण करीत जखमी केले. जखमी महिलेच्या तक्रारीवरून ...

Wife beaten for refusing to eat together | एकत्र जेवण्यास नकार दिल्याने पत्नीस मारहाण

एकत्र जेवण्यास नकार दिल्याने पत्नीस मारहाण

माैदा : एकाच ताटात एकत्र जेवण्यास नकार दिल्यावरून आराेपी पतीने त्याच्या पत्नीस मारहाण करीत जखमी केले. जखमी महिलेच्या तक्रारीवरून पाेलिसांनी आराेपीला ताब्यात घेऊन त्याची सूचनापत्रावर सुटका करण्यात आली. ही घटना माैदा शहरातील तक्षशीलनगर येथे गुरुवारी (दि. ९) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

राकेश मेश्राम (२२, रा. तक्षशीलनगर, इंडालकाे गेट माेबाईलजवळ, माैदा) असे आराेपीचे नाव असून, चकॅली राकेश मेश्राम, असे जखमी महिलेचे नाव आहे. राकेशचे तीन वर्षांपूर्वी चकॅलीशी लग्न झाले असून, त्याला दारूचे व्यसन आहे. ताे तिच्यावर संशय घेताे व तिला मारहाण करताे. त्यामुळे ती मंगळवारी (दि. ७) आपल्या वहिनीकडे गेली हाेती. दरम्यान, गुरुवारी राकेश तिथे गेला व तिला एकाच ताटात जेवण्यासाठी आग्रह करू लागला. यावर तिने नकार दिल्याने आराेपीने तिच्या गालावर व उजव्या हातावर ब्लेडने वार करून जखमी केले. याबाबत तिने पाेलिसांत तक्रार दाखल केली.

याप्रकरणी माैदा पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपीला ताब्यात घेत त्याची सूचनापत्रावर सुटका केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस नाईक राजू आंधळे करीत आहेत.

Web Title: Wife beaten for refusing to eat together