पत्नीला सासरी न पाठविल्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:09 IST2021-07-31T04:09:14+5:302021-07-31T04:09:14+5:30
सावनेर/पाटणसावंगी : पत्नीला सासरी पाठवित नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीच्या नातेवाईकांशी वाद घातला. त्यातच त्या पतीने सासऱ्याकडे काम करणाऱ्या कामगारास ...

पत्नीला सासरी न पाठविल्याने मारहाण
सावनेर/पाटणसावंगी : पत्नीला सासरी पाठवित नसल्याच्या कारणावरून पतीने पत्नीच्या नातेवाईकांशी वाद घातला. त्यातच त्या पतीने सासऱ्याकडे काम करणाऱ्या कामगारास मारहाण व शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना सावनेर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगी येथे बुधवारी (दि. २८) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
रामू ऊर्फ इमरान सुलतान बेग (२४, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर) असे जखमीचे नाव असून, नासीर शेख माेहम्मद आसिफ (३०, रा. यशोदानगर, पारडी, नागपूर) असे आराेपीचे नाव आहे. रामू हा नासीर शेख माेहम्मद आसिफ याच्या सासऱ्याकडे गुरे चारण्याचे काम करायचा. नासीर शेख माेहम्मद आसिफ हा त्याच्या पत्नीला मारहाण करीत असल्याने ती माहेरी गेली हाेती. तिला सासरी पाठविण्यासाठी त्याने सासऱ्याशी भांडण केले हाेते. याच रागातून ताे रामूच्या खाेलीत शिरला आणि त्याला बेदम मारहाण करीत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्याच्यावर नागपूर शहरातील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ३०७, ४५२ अन्वये गुन्हा दाखल करून आराेपीस अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक निशांत फुलेकर करीत आहेत.