शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने स्वतःचा पॉर्न व्हिडीओ इंटरनेटवर टाकल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 11:48 IST

Nagpur : हायकोर्टाने पतीची याचिका फेटाळली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्नीने स्वतःचा पॉर्न व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल केल्याचा आरोप आणि पत्नीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी करणारी पतीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने ठोस पुराव्यांअभावी फेटाळून लावली. न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी हा निर्णय दिला.

पती दिघोरी येथील रहिवासी असून कौटुंबिक वादामुळे त्याची पत्नी अमरावती येथे वेगळी राहत आहे. त्याने सुरुवातीला प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयामध्ये पत्नीविरुद्ध बदनामीचा दावा दाखल केला होता. पत्नीने आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केली, असे त्याचे म्हणणे होते. ही याचिका प्रलंबित असताना पतीला एका अज्ञात व्यक्तीने पत्नीच्या पॉर्न व्हिडीओची माहिती दिली.

तो व्हिडीओ पत्नीचाच असल्याची खात्री पटल्यानंतर पतीने व्हिडीओमधील पुरुषाविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल कर, असे पत्नीला सांगितले. परंतु, पत्नीने त्याला नकार दिला. परिणामी, पतीने त्याच्या दाव्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गतच्या गुन्ह्यांचा समावेश करण्यासाठीही अर्ज केला होता. 

मुद्द्यांमध्ये गुणवत्ता नाही...

  • ६ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने पतीचा दावा फेटाळून लावला. पत्नीने घरामध्ये अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
  • ती शिवीगाळ बाहेरच्या व्यक्तीने ऐकल्याचे पतीचे म्हणणे नाही. त्यामुळे पतीची बदनामी झाली नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. या निर्णयाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
  • न्याय दंडाधिकारी न्यायालयाने माहिती तंत्रज्ञान कायद्यातील गुन्ह्यांचा विचारच केला नाही. त्यासंदर्भात पत्नीला नोटीस जारी केली नाही, असे त्याचे म्हणणे होते. उच्च न्यायालयालाही पतीच्या मुद्द्यांमध्ये गुणवत्ता आढळून आली नाही. परिणामी, त्याला दिलासा मिळाला नाही.
टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर