सोनेगावात विधवेवर सामूहिक बलात्कार
By Admin | Updated: December 5, 2014 00:44 IST2014-12-05T00:44:21+5:302014-12-05T00:44:21+5:30
विधवा महिलेला मारहाण करून तीन नराधमांनी तिच्यावर रात्रभर पाशवी अत्याचार केला. कळमन्यातील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींचा छडा लागायचा असतानाच सोनेगाव पोलीस

सोनेगावात विधवेवर सामूहिक बलात्कार
नागपूर : विधवा महिलेला मारहाण करून तीन नराधमांनी तिच्यावर रात्रभर पाशवी अत्याचार केला. कळमन्यातील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील आरोपींचा छडा लागायचा असतानाच सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी रात्री ही घटना घडली. यामुळे सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पीडित महिला ५५ वर्षांची असून, मूळची राजनांदगाव (छत्तीसगड) मधील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी पतीसोबत ती कामाच्या शोधात नागपुरात आली आणि येथेच हे जोडपे स्थिरावले. गेल्या वर्षी या महिलेच्या पतीचे निधन झाले तेव्हापासून बेलतरोडीतील एका झोपड्यात ही निराधार महिला एकटीच राहते. ती धुणीभांडी करून आपला उदरनिर्वाह करते.
तिची मानलेली बहीण शामनगरात राहते. तिची प्रकृती चांगली नसल्यामुळे पीडित महिला तिच्या घरी गेली होती. जेवण घेतल्यानंतर रात्री ८ च्या सुमारास ती घराकडे परतली. एकटी असल्यामुळे तिच्या जावयाने तिच्यासोबत हरी म्हात्रे नामक व्यक्तीला पाठविले.
महिला बेशुद्ध पडली
रात्रभर अनेकदा अत्याचार झाल्यामुळे महिला बेशुद्ध पडली. सकाळी ६ वाजता तिला शुद्ध आली. मात्र, सर्वांग ठणकत असल्यामुळे तिला १ वाजेपर्यंत उठताच आले नाही. दुपारी तिने आपल्या बहिणीला आणि शेजारच्या महिलेला ही घटना सांगितली. त्या महिलेने लगेच सामाजिक कार्य करणाऱ्या एका महिलेला आणि पोलिसांना फोन करून कळविले. पोलीस घटनास्थळी पोहचले.