लसीकरणात नागपूरवर अन्याय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:07 IST2021-07-05T04:07:11+5:302021-07-05T04:07:11+5:30
नागपूर : राज्याच्या उपराजधानीत लसींचा साठाच उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई, पुण्यात मात्र लसीकरण ...

लसीकरणात नागपूरवर अन्याय का?
नागपूर : राज्याच्या उपराजधानीत लसींचा साठाच उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबई, पुण्यात मात्र लसीकरण केंद्रांवर दररोज लसी उपलब्ध होत आहेत. केंद्र सरकारकडून राज्याला सर्वात जास्त लसी मिळत आहे. असे असताना राज्य शासनाकडून नागपूरवर अन्याय का होत आहे, असा सवाल भाजपचे आ. कृष्णा खोपडे यांनी केला आहे.
राज्याच्या हाती लसीकरण असताना त्याची गती संथच होती. आता केंद्राकडून सर्वात जास्त प्रमाणात लसी मिळत असताना महाविकास आघाडी सरकार त्यात राजकारण करत आहे. महापौरांनी लसींच्या खरेदीची राज्य शासनाकडे परवानगी मागितली. मात्र त्याबाबत शासनाने कुठलीही संवेदना दाखविली नाही. उपराजधानीतील प्रकल्प अडचणीत आणण्याचा प्रयत्न राज्य शासन करत असताना आता लसीकरणाबाबतदेखील तीच भूमिका घेतली आहे. यामुळे उपराजधानीतील लोकांच्या जिवावर बेतण्याचा धोका आहे. नागपूर राज्याची उपराजधानी आहे याचा राज्य सरकारला विसर पडला की काय, असा सवाल खोपडे यांनी उपस्थित केला आहे.