शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणातील भ्रष्टाचाराची चौकशी ईडी-सीबीआयमार्फत का नाही? आमदार नीरज शर्मांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 11:35 IST

आमदार नीरज शर्मा हे एक कथावाचकही आहेत. ते हरियाणातील फरिदाबाद शहराचे प्रतिनिधित्व करतात. आमदार शर्मा यांनी त्यांच्या शहरातील तब्बल एक हजार कोटींचे घोटाळे एकट्यानेच उघडकीस आणल्याचा दावा केला आहे.

ठळक मुद्देअंगावर पंचा घालून चालते बोलते आंदोलन

नागपूर : छोट्या-छोट्या प्रकरणांची ईडी-सीबीआयमार्फत चौकशी केली जाते परंतु हरियाणा येथील शेकडो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार उघडकीस येऊनही त्याची चौकशी ईडी-सीबीआयमार्फत का केली जात नाही? असा सवाल भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही, तोपर्यंत अंगावर शिवलेले कपडे परिधान करणार नाही तसेच पायात चप्पल व जुते घालणार नाही, असा पण करणारे काँग्रेसचेआमदार नीरज शर्मा यांनी येथे उपस्थित केला. रविवारी काही कामानिमित्त ते नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी ‘लोकमत’शी खास बातचीत केली.

आमदार नीरज शर्मा हे एक कथावाचकही आहेत. ते हरियाणातील फरिदाबाद शहराचे प्रतिनिधित्व करतात. आमदार शर्मा यांनी त्यांच्या शहरातील तब्बल एक हजार कोटींचे घोटाळे एकट्यानेच उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. त्यावर त्यांनी अनेकदा प्रश्न उपस्थित केले. त्यांची चौकशी झाली. दक्षता समितीने गुन्हे दाखल करण्याची शिफारसही केली तरी कारवाई झाली नाही.

चार-पाच वर्षांपासून आपण भ्रष्टाचाराचा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. त्याचे पुरावेसुद्धा सादर केले. या घोटाळ्यात सामील अधिकाऱ्यांची नावेसुद्धा सभागृहात जाहीर केली. तरी कारवाई झाली नाही. त्यामुळे त्यांनी थेट विधानसभा सभागृहातच उपरोक्त संकल्प केला. याला आता १५ दिवस होत आले आहेत. त्यांचे हे चालते फिरते आंदोलन अजूनही सुरूच आहे. यावेळीसुद्धा त्यांनी आपला पण पुन्हा एकदा बोलून दाखविला. त्यांचे म्हणणे होते की, मी भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे सादर केले तरी कारवाई होत नाही, याला काय म्हणावे?

अंगावर शिवलेले कपडे घालणार नाही

अंगावर शिवलेले कपडे घालणार नाही, हा संकल्प असून तो माझ्या आंदोलनाचाच एक भाग आहे. या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी काही पाऊल उचलले. जसे जिल्हाधिकारी व एसपी यांच्या नेतृत्वात चौकशी समिती नेमली. विभागीय स्तरावर अधिकार दिले. परंतु कारवाई मात्र झालेली नाही. त्यामुळे जोपर्यंत भ्रष्टाचाऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आपला हा संकल्प कायम राहील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणHaryanaहरयाणाcongressकाँग्रेसMLAआमदार