नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज हे जनतेचे आराध्यदैवत असताना नवीन पिढीपर्यंत त्यांचे कार्य हवे त्या प्रमाणात नेण्यास ‘सीबीएसई’कडून दिरंगाई करण्यात येत आहे. ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांतच का आहे, असा सवाल विधानपरिषदेत सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला.
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
सदस्य सत्यजित तांबे यांनी सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील इतिहासाचे लेखन अपुरे असल्याबद्दल अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत शिक्षण विभाग अतिशय उदासीन असल्याची टीका त्यांनी केली. कमी शब्दांचा इतिहास हा महाराजांचा अवमान असल्याचे किशोर दराडे म्हणाले. युट्यूबवरून छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे नाटक, मजकूर हटविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. यावर बोलताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ‘सीबीएसई’च्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांच्या संदर्भातील इतिहासाची माहिती वाढविण्यासाठी एनसीआरटीशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे नाटक युट्यूबवरून हटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेदेखील सांगितले.
शिवाजी महाराज अस्सल चरित्र साधन खंडनिर्मिती
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत योग्य गौरवाने प्रसारित व्हावा, याबाबत राज्य सरकार कटिबद्ध असून, यासाठी पाठपुरावा अधिक वेगाने केला जाणार आहे. शिवरायांवरील चरित्र खंड निर्मिती करणार असल्याचे आश्वासन भोयर यांनी दिले. त्याचप्रमाणे शाळांमध्ये शिवचरित्रांचे वाचन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Web Summary : Legislative Council questions CBSE for limiting Shivaji Maharaj's history to 68 words. Members demand removal of defamatory content against Chhatrapati Sambhaji Maharaj from YouTube. State assures action.
Web Summary : विधान परिषद ने शिवाजी महाराज के इतिहास को 68 शब्दों तक सीमित करने पर सीबीएसई से सवाल किया। सदस्यों ने छत्रपति संभाजी महाराज के खिलाफ यूट्यूब से मानहानिकारक सामग्री हटाने की मांग की। राज्य ने कार्रवाई का आश्वासन दिया।