उसनवारीवर महोत्सव कशाला?

By Admin | Updated: November 19, 2014 00:47 IST2014-11-19T00:47:46+5:302014-11-19T00:47:46+5:30

स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) मुळे महापालिकेला जबर आर्थिक फटका बसला. याचा परिणाम रस्ते, पाणीपुरवठा व आरोग्य अशा मूलभूत सुविधांवर झाला आहे. पैसा नाही म्हणून नागरिकही गप्प आहेत.

Why the festival? | उसनवारीवर महोत्सव कशाला?

उसनवारीवर महोत्सव कशाला?

महापालिका : आधी रस्ते दुरुस्त करा, नंतर भव्यदिव्य समारंभ घ्या
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्था कर(एलबीटी) मुळे महापालिकेला जबर आर्थिक फटका बसला. याचा परिणाम रस्ते, पाणीपुरवठा व आरोग्य अशा मूलभूत सुविधांवर झाला आहे. पैसा नाही म्हणून नागरिकही गप्प आहेत. असे असतानाही उसनवारीच्या पैशावर नागपूर महोत्सवाचे भव्य-दिव्य आयोजन कशाला असा प्रश्न शहरातील नागरिक ांना पडला आहे.
निधी नसल्याने दोन वर्षापासून रस्त्यांची दुरुस्ती, सिमेंट रस्ते, कवीवर्य सुरेश भट सभागृह, उड्डाण पूल, लंडस्ट्रीट, नंदग्राम, पाणीपुरवठा अशा अनेक योजनांची कामे रखडलेली आहेत. मनपा तिजोरीत पैसा नसल्याने दर महिन्याला कर्मचाऱ्यांना वेतन कसे द्यावे असा प्रश्न प्रशासनापुढे उभा ठाकला आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देणे अवघड जात असल्याने नवीन भरती नाही. याचा नागरी सुविधांवर परिणाम झाला आहे. असे असतानाही नागपूर महोत्सवाचे भव्य-दिव्य आयोजन करण्याचा घाट पदाधिकाऱ्यांनी घातला आहे.
महापालिकेच्या शतकोत्तर महोत्सवानिमित्त गेल्या वर्षी आयोजित कार्यक्रमासासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी न आल्याने हा कार्यक्र म पुढे ढकलण्यात आला. त्यातच लोकसभा व विधानसभा निवडणुकीमुळे कार्यक्रम होऊ शकले नाही.
निवडणुकीनंतर केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आले. त्यामुळे शासनाकडून व प्रायोजकांकडून निधी मिळेल या आशेने नागपूर महोत्सवाचे भव्य-दिव्य आयोजन करण्याचा मनपाचा मानस आहे. महापौर प्रवीण दटके व आयुक्त श्याम वर्धने यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. यात महोत्सव दणकेबाज साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महोत्सवाला विरोध नाही. असे कार्यक्र म व्हायलाच हवे, पण यासाठी पैसाही लागतो. तिजोरीत पैसा असेल तर हरकत नाही. एलबीटीमुळे मनपाची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातच एलबीटी रद्द करण्याची भाजप नेत्यांनी घोषणा केल्याने जे व्यापारी एलबीटी भरणार होते, त्यांनीही आता एलबीटी भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे महोत्सवासाठी शासनाकडे हात पसरावे लागतील. देणगीदारांचा शोध सुरू आहे. या पैशातून कलावंतांना कार्यक्र मासाठी निमंत्रित केले जाणार आहे. कर्ज घेऊन व देणगीच्या पैशातून सणवार साजरे करण्याचा हा प्रकार आहे. महोत्सवानिमित्त राष्ट्रीय पातळीवरील अर्धमॅरेथॉन स्पर्धा, सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.विख्यात तबलावादक झाकीर हुसेन, गायिका आशा भोसले, शंकर महादेवन, एहसान लॉय आदींना निमंत्रित केले आहे.(प्रतिनिधी)

Web Title: Why the festival?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.