पक्षपात कशासाठी ?

By Admin | Updated: February 7, 2015 01:59 IST2015-02-07T01:59:27+5:302015-02-07T01:59:27+5:30

‘नो पार्किंग’मधील वाहने उचलण्याच्या पन्नास टक्के नियमांची अंमलबजावणीच होत नाही. कारवाई करताना मोठ्या प्रमाणावर पक्षपात केला जात आहे,

Why favoritism? | पक्षपात कशासाठी ?

पक्षपात कशासाठी ?

सुमेध वाघमारे नागपूर
‘नो पार्किंग’मधील वाहने उचलण्याच्या पन्नास टक्के नियमांची अंमलबजावणीच होत नाही. कारवाई करताना मोठ्या प्रमाणावर पक्षपात केला जात आहे, हे साक्षात वास्तव एका पाहणीत आढळून आले. कुठल्याही रस्त्यावरील दुचाकी वाहने सर्रास उचलून नेली जातात. वाहतुकीला अडथळा असल्याचे सांगून ही कारवाई केली जाते.
सीताबर्डीच्या मोदी नंबर ३ मध्ये दोन्ही भागात वाहन उभी करण्यास मनाई आहे, तसा फलकही लावण्यात आला आहे. परंतु दुकाने, हॉटेल्ससमोरील पहिल्या रांगेतील वाहने उचलली जात नाहीत, परंतु याच गल्लीतील इतर ठिकाणच्या पहिल्या रांगेतील वाहने उचलतात. दुकानासमोर सुरक्षा रक्षक असेलतर डबल पार्किंग लावली तर त्याला हात लावण्याची कुणाची हिंमत होत नाही. विशेष म्हणजे, ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या गाड्या उचलण्यासाठी जे नियम आहेत त्यातील पन्नास टक्केही नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे.
वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे ही जनहिताचीच बाब आहे. मात्र, अनधिकृत पार्किंगच्या नावाखाली दुचाकी वाहने उचलण्याच्या कारवाईवर ‘लोकमत’चमून लक्ष ठेवले असता यात भेदभाव केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पार्किंगसाठी जागा
नसतानाही इमारतींना परवानगी!
कोणत्याही इमारतीचा आराखडा मंजूर करताना त्या इमारतीला पार्किंग आहे की नाही, हे पाहिल्यानंतरच त्या इमारतीला परवानगी देण्याचे काम महापालिकेचे आहे.
असे असतानाही सीताबर्डीसारख्या परिसरात बोटावर मोजण्याइतक्या इमारती सोडल्यास कुणाचकडे पार्किंगची जागा नाही. बहुसंख्य वाहने रस्त्यावर उभी केली जातात.

Web Title: Why favoritism?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.