शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
2
"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
3
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
6
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
7
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
8
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
9
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
10
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
11
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
12
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
13
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
14
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
15
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
16
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
17
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
18
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

गोड बोलण्याची औपचारिकता कशाला? तसे वागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 10:12 AM

मकरसंक्रांतीच्या शुभपर्वावर, त्याची दररोजच्या जीवनातील महती विशद करणारे हे नवे सदर. यात जीवनातील गोडवा हा कशात दडला आहे, याचा उलगडा करत आहेत, चंद्रशेखर बावनकुळे, उर्जा व उत्पादनशुल्क मंत्री, महाराष्ट्र राज्य.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:गोड बोलण्याची औपचारिकता मला आवडत नाही. हा माझ्या स्वभावातील दोष आहे. पण काम घेऊन आलेल्या निराश माणसाला मदत करून, त्याच्या संकटात धावून मी त्याला आनंदी करतो. ती उणीव मी अशी भरून काढतो. कुणी चुकून दुखावले तर त्याची लगेच जाणीव होते. मग मी त्याला बोलावूनही घेतो. माझ्या मनावरील दडपण असे दूर होते.राडी मंदिराच्या परिसरात माझे बालपण गेले. तिथे मामाचे किराण्याचे दुकान होते. दुकानात मी काम करायचो. आजीला दूध विकायलाही मदत करीत असे. संध्याकाळ झाल्यानंतर मंदिरातील दिव्याखाली बसून रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत राहायचो. मजुरी आणि शिक्षण हाच माझा त्यावेळचा दिनक्रम. इतरांसारखे बालपण मी अनुभवलेच नाही. कधी खेळलो नाही. इच्छा असूनही परिस्थितीमुळे दंगामस्ती करू शकलो नाही.गरिबीने लहानपणीच मला शहाणे केले. मामाच्या दुकानात गिºहाईक यायचे. त्यांच्याशी गोड बोलत असल्याने सर्वांचा मी आवडता होतो. लोकांशी आपण चांगले वागलो की लोकही आपल्यावर प्रेम करतात ही शिकवण मला किराणा दुकानात आणि लोकांच्या घरी दूध वाटताना मिळाली.पुढे अपघाताने राजकारणात आलो. कुटुंबात अशी कुठलीही पार्श्वभूमी नव्हती. पण पुढे यश मिळत गेले. त्याचे संपूर्ण श्रेय या लोकसंग्रहालाच आहे. ताणतणावाचे प्रसंग तसे जन्म झाल्यापासूनच. पण परिस्थितीमुळे येणारे ताणतणाव माणसाला खचवत नाहीत, उलट मजबूतच करतात. मीदेखील अशाच अनेक घटनांमधून शिकत गेलो. आॅटो चालवायचो, पुढे लग्न केले. दोन-तीन दिवस त्या आॅटोत संसारदेखील केला. लोक थट्टा करायचे, हिणवायचे. पण एक गोष्ट ठावूक होती की, यातून आपले सुखाचे दिवस येील. आमदारकी, पुढे मंत्रिपद हे राजकारणातील यश मिळाल्यानंतरही मला जुन्या दिवसांचा विसर पडू नये हीच गोष्ट मी परमेश्वराला एकच गोष्ट मागत असतो. लोक मला भेटलेले आवडतात. त्यांची कामे करताना समाधान मिळते. शक्यतोवर कुणाला नाराज करून पाठवत नाही. त्याचे काम होईपर्यंत मी अस्वस्थ असतो. त्याचे काम झाले की आनंद येतो. माझ्या मनावरील ताणतणावाचे मी असे नियोजन केले आहे. उद्याची चिंता मला खरंच भेडसावत नाही. कारण आपल्या बालपणाचा संघर्ष मी सतत आठवत असतो. हेवा, मत्सर, गटबाजी यासाठी वेळ मिळत नाही. कारण सतत कामात असतो. 

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे