संघातील अन्य खेळाडूंना जे नियम लागू होतात ते कोहलीसाठी नाहीत का, असा सवालदेखील सेहवागने उपस्थित केला आहे.
तो म्हणाला, ‘भारतीय संघात सर्व खेळाडूंसाठी सारखेच नियम असायला हवेत.
पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले होते. या सामन्यात श्रेयस अय्यरला डच्चू देण्यात आला होता. श्रेयस सध्या जास्त धावा करत नाही, त्यामुळे त्याला वगळण्यात आले असावे. त्याचबरोबर सलामीवीर मयांक अग्रवाललाही चांगली फलंदाजी करत नसल्यामुळे त्याला संधी दिली नसावी. पण दुसरीकडे विराटलाही आतापर्यंत मोठी खेळी करता आलेली नाही. कामगिरीत सातत्य ठेवता आलेले नाही. त्यामुळे कोहलीला संघात स्थान कसे मिळते, यावर सेहवागने बोट ठेवले.
मनीष पांडेला भारतीय संघात संधी दिली होती. पण या सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात मनीषला संघातून डच्चू देण्यात येऊ शकतो. जडेजाच्या पायांचे स्नायू दुखावले होते. ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे तो या सामन्यात गोलंदाजी करू शकत नव्हता. जडेजाच्या जागी चहलला भारतीय संघात स्थान देण्यात आले आणि त्याने गोलंदाजीही केली. आगामी दोन सामन्यांसाठी संघात युवा गोलंदाज शार्दुल ठाकूरला स्थान देण्यात आले. शार्दुलने त्याआधी, तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात गोलंदाजी केली होती. त्याने तीन तीन बळी घेत सामना जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.