नागपुरातील ‘डबलडेकर’च्या बांधकामाला विलंब का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 10:59 AM2019-08-02T10:59:51+5:302019-08-02T11:00:59+5:30

छत्रपती चौकातील डबलडेकर पुलाच्या बांधकामाची गती संथ आहे. पुलावर एनएचएआय लेव्हलचे कार्य अजूनही पूर्ण झालेले नाही. उड्डाण पूल तोडला तेव्हा अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचे संकेत दिले होते. पण मर्यादा संपून आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे.

Why delay in construction of 'doubledecker' in Nagpur? | नागपुरातील ‘डबलडेकर’च्या बांधकामाला विलंब का?

नागपुरातील ‘डबलडेकर’च्या बांधकामाला विलंब का?

Next
ठळक मुद्देमनीषनगर आरयूबी बांधकामावर परिणामवाढत्या कोंडीमुळे वाहतुकीला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्रपती चौकातील डबलडेकर पुलाच्या बांधकामाची गती संथ आहे. पुलावर एनएचएआय लेव्हलचे कार्य अजूनही पूर्ण झालेले नाही. उड्डाण पूल तोडला तेव्हा अडीच वर्षांत काम पूर्ण होण्याचे संकेत दिले होते. पण मर्यादा संपून आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डबलडेकरवर एनएचएआय लेव्हल कामाची गती अजूनही वाढलेली नाही. चार पदरी पुलाच्या मध्यभागातून मनीषनगरकडे जाणाऱ्या सहा पदरी जोडरस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे आरयूबीचे काम वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.
आता विधानसभा निवडणुका अडीच महिन्यांवर असल्यामुळे मनीषनगर आरओबी व आरयूबीला दोन महिन्यात पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. ३.४१ कि.मी. लांब छत्रपती चौक डबलडेकर ८९० कोटी रुपये गुंतवणुकीतून तयार करण्यात येत आहे.
पुलाच्या गतीसंदर्भात महामेट्रोचे कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी केवळ पुलासंदर्भात आणि काम डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगितले. पण नवीन पुलाच्या बांधकामाच्या सुरुवातीला हे काम जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण होण्याची घोषणा केली होती.
बांधकामाला उशीर होत असल्यामुळे या भागातील रहिवासी अणि वर्धा रोडवरून ये-जा करणाºया वाहनचालकांना बराच वेळ रस्त्यावरील कोंडीत उभे राहावे लागते. त्यामुळे त्यांना असुविधांचा सामना करावा लागतो. बांधकामासाठी नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे बांधकामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह उभे करण्याचा त्यांचा हक्क आहे. महामेट्रो ५डी बीम तंत्रज्ञानासंदर्भात अनेक दावे करीत आहे. या तंत्रज्ञानामुळे बांधकाम वेळेत पूर्ण होत असल्याचे महामेट्रोचे मत असतानाच या बांधकामाला उशीर का होत आहे, हा गंभीर प्रश्न आहे.
आठ दिवसात तोडला जुना उड्डाण पूल
जुना छत्रपती उड्डाण पूल १५ नोव्हेंबर २०१६ पासून तोडण्यास प्रारंभ केला होता आणि आठ दिवसात जमीनदोस्त केला होता. त्याकरिता आधुनिक आणि जड मशीनचा उपयोग केला होता. त्यावेळी लोकांना अनेक महिने लांब फेºया मारून ये-जा करावी लागत होती. पूल तुटताना धूळ आसपासच्या परिसरात उडत होती. जुना पूल १९९८ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधला होता. ४०० मीटर लांबीच्या पुलाचे वय ५० वर्ष होते. पण मेट्रोच्या कामासाठी पूल १८ वर्षांतच तोडावा लागला होता.

Web Title: Why delay in construction of 'doubledecker' in Nagpur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Metroमेट्रो