शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
4
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
5
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
6
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
7
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
8
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
9
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
10
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
11
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
12
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
13
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
14
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
15
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
16
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
17
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
18
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
19
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
20
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल

गंटावार दाम्पत्याला आयुक्तांचे अभय कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 12:25 AM

आयुक्त तुकाराम मुंढे यांचे गंटावार दाम्पत्याला अभय कशासाठी, असा सवाल मनपातील सत्ता पक्षनेते संदीप जाधव व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार आणि त्यांची पत्नी वैद्यकीय अधिकारी डॉ. शालू गंटावार यांना तात्काळ निलंबित करून गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवकांनी सभागृहात केली. तसेच महापालिका आयुक्तांकडे पुराव्यानिशी फेब्रुवारी महिन्यात गंटावार यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. परंतु अद्याप गंटावार दाम्पत्याच्या विरोधात कुठलीही कारवाई केलेली नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांचे गंटावार दाम्पत्याला अभय कशासाठी, असा सवाल मनपातील सत्ता पक्षनेते संदीप जाधव व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.महापालिका समिती विभागाच्या २१ मार्च २०१६ रोजीच्या आदेशानुसार महापालिकेत कार्यरत कुठल्याही डॉक्टरला खासगी व्यवसाय करता येत नाही. असे असतानाही गंटावार कोलंबिया नर्सिंग हॉस्पिटल चालवीत आहे.महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा १९४९ अंतर्गत कलम ५ नुसार दिलेल्या निर्देशानुसार शासकीय सेवेत कार्यरत डॉक्टरांना कुठल्याही स्वरूपात व्यक्तिगत रुग्णालय चालविता येत नाही असे असतानाही गंटावार कोलंबिया नर्सिंग होम चालवित आहेत.महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक आणि शिस्त व अपील नियम १९८९ च्या नियम ५अंतर्गत शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती राजकीय संघटना चालवू शकत नाही. तसेच कुठल्याही राजकीय पक्षाच्या आंदोलनात सहभागी होऊ शकत नाही. असे असतानाही शालू गंटावार 'मध्य प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष असून काँग्रेस पक्षाच्या सक्रिय पदाधिकारी आहे. त्यांनी शालू पदराम या नावाने काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. याबाबतचे पुरावे त्यांच्या फेसबुकवर उपलब्ध आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. याबाबतचे पुरावे आयुक्तांकडे दिले आहे. अशी माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली.गंटावार यांच्याविरोधात एसीबीने उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. एसीबीच्या चौकशीत या दाम्पत्याने दोन कोटीपेक्षा अधिक रुपयाची मालमत्ता बाळगल्याची नोंद आहे यानंतरही आयुक्तांनी गेल्या २४ तासात त्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही..... तर ऑडिओ क्लिप जाहीर करणारपुरावे दिल्यानंतरही मनपा आयुक्त डॉ. गंटावार दाम्पत्यावर कोणत्याही स्वरुपाची कारवाई करत नसेल तर गंटावार आणि आयुक्त यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप जाहीर करू ,असा इशारा दयाशंकर तिवारी यांनी यावेळी दिला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्तdoctorडॉक्टर