शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

‘एसबीएल’च्या मालकावर कुणाचा वरदहस्त, अद्यापही ‘आऊट ऑफ रिच’

By योगेश पांडे | Updated: March 5, 2026 20:37 IST

Nagpur : शोधासाठी तीन पथके रवाना, पोलिसांचे हात रिकामेच : कामगारांच्या जखमांवर आणखी किती मीठ चोळणार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथील ‘एसबीएल एनर्जी लिमिटेड’मध्ये झालेल्या स्फोटात १९ कामगारांचे बळी गेल्यानंतरदेखील कंपनीचा मालक संजय चौधरी व आलोक चौधरी फरारच आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सक्षम व तंत्रज्ञानयुक्त गुप्तचर यंत्रणा असल्याचा दावा करणाऱ्या नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हाती त्याचा अद्याप काहीही सुगावा लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली असून त्याला ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

ज्या दिवशी स्फोट झाला त्याच दिवशी संजय चौधरी व आलोक चौधरी छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपुरातून नागपूरच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र गुन्हा दाखल झाल्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती कळताच दोघेही अचानक गायब झाले. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते सायंकाळपर्यंत संपर्कात होते. त्यानंतर त्यांचे फोनदेखील बंद झाले व दोघेही ‘आऊट ऑफ रिच’ झाले. स्फोटाला चार दिवस उलटून गेल्यावरदेखील दोघांविरोधातदेखील कुठलाही सुगावा लागलेला नाही. दोघेही देश सोडून जाण्याची शक्यता असल्याने ‘लुकआऊट’ नोटीस जारी करण्यात आली आहे. शिवाय नागपूर ग्रामीण पोलिसांकडून तीन शोधपथके विविध शहरांमध्ये पाठविण्यात आली आहेत. मात्र अद्यापपर्यंत पोलिसांना कुठलेही यश मिळालेले नाही. ‘एसबीएल’ कंपनीत मध्य भारतातील अनेकांची गुंतवणूक आहे. शिवाय अनेकांचे ‘अर्थपूर्ण’ व्यवहारदेखील चालतात. त्यातूनच कुणीतरी चौधरीला लपण्यासाठी ‘पॅसेज’ दिला असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कळमेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज काळबांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शोधमोहीम सुरू असल्याचेच सांगितले.

इतर ८ आरोपीदेखील ताब्यात नाहीत

दरम्यान, पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती. त्यासोबतच गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये केदान पंचपुत्रे, राजू पारधी, रवींद्र पोखरना, श्रवणकुमार, सत्यवती पराशर, अलोक अवधिया, मनोजकुमार प्रसाद, नितीन चंदनमल, अतुल गुप्ता यांचादेखील समावेश होता. हेदेखील अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. यातील अनेक जण कंपनीतील अधिकारी किंवा सूपरवायझर आहेत. मात्र त्यांनादेखील पकडण्यात पोलिसांना यश न आल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

‘लूकआऊट’चा किती फायदा होणार ?

चौधरी देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी ‘लूकआऊट नोटीस’ जारी करण्यात आली आहे. सोबतच चौधरीच्या रायपूर येथील घराचीदेखील झडती घेण्यात आली. मात्र चौधरी हा देशातच कुठेतरी लपला असण्याची दाट शक्यता आहे. चौधरीचे बऱ्याच राजकीय नेत्यांसोबतचदेखील विशेष ‘कनेक्शन’ आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : SBL Owner Still at Large; Political Connections Suspected.

Web Summary : SBL Energy owner, Sanjay Choudhary, remains absconding after factory blast. Despite a lookout notice and searches, police haven't found him or other officials. Political connections are suspected to be aiding his evasion.
टॅग्स :nagpurनागपूरBlastस्फोटCrime Newsगुन्हेगारी