इतवारी घाऊक किराणा व धान्य बाजारात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:06 IST2021-04-18T04:06:59+5:302021-04-18T04:06:59+5:30
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि मृतकाची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इतवारी किराणा आणि धान्य बाजार असोसिएशनने वीकेंड डाकडाऊन ...

इतवारी घाऊक किराणा व धान्य बाजारात शुकशुकाट
नागपूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आणि मृतकाची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इतवारी किराणा आणि धान्य बाजार असोसिएशनने वीकेंड डाकडाऊन अर्थात शनिवार आणि रविवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोन्ही बाजारात शनिवारी शुकशुकाट होता. या बाजारातील जवळपास ५०० पेक्षा जास्त दुकाने बंद होती.
इतवारी किराणा मर्चंट असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवप्रताप सिंह म्हणाले, शासनाच्या आदेशानुसार इतवारी आणि मस्कासाथ येथील किराणा दुकाने सुरू असल्याने दररोज ग्राहकांची गर्दी व्हायची. गर्दीवर आवर घालणे दुकानदारांना कठीण व्हायचे. गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने असोसिएशनने लॉकडाऊनपर्यंत शनिवार व रविवारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग कमी होण्यास निश्चितच मदत होणार आहे. याशिवाय आठवड्यात इतर दिवशी या बाजारातील दुकाने सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत सुरू राहणार आहे.
इतवारी व कळमना धान्य बाजाराचे सचिव प्रताप मोटवानी म्हणाले, धान्याच्या अनावश्यक खरेदीसाठी ग्राहक इतवारी व कळमन्यात गर्दी करायचे. त्यातून कोरोना संसर्गाची भीती वाढली होती. त्यामुळे असोसिएशनने वीकेंड लॉकडाऊनला दुकाने बंद ठेवण्याचा एकमताने निर्णय घेतला. याशिवाय दुकाने सकाळी ९ ते दुपारी ४ पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे दोन्ही धान्य बाजारातील ३०० पेक्षा जास्त दुकाने बंद राहतील. दुकाने सोमवारपासून नियमित सुरू राहणार आहे.