कळमन्यातील होलसेल धान्य बाजार मंगळवार, गुरुवार, शनिवारी सुरू राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 23:26 IST2020-04-14T23:25:19+5:302020-04-14T23:26:04+5:30
कळमना येथील होलसेल धान्य अनाज बाजार (न्यू ग्रेन मार्केट) आता आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती कळमनाचे सचिव राजेश भुसारी यांनी मंगळवारी मोबाईलवरून दिल्याचे होलसेल ग्रेन अॅन्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी सांगितले.

कळमन्यातील होलसेल धान्य बाजार मंगळवार, गुरुवार, शनिवारी सुरू राहणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कळमना येथील होलसेल धान्य अनाज बाजार (न्यू ग्रेन मार्केट) आता आठवड्यात मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू राहणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती कळमनाचे सचिव राजेश भुसारी यांनी मंगळवारी मोबाईलवरून दिल्याचे होलसेल ग्रेन अॅन्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी सांगितले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशानुसार होलसेल धान्य बाजार मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी सुरू राहणार आहे. भुसारी यांच्यानुसार कळमना बाजारात होणारी गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने कोरोना व्हायरस महामारीच्या संक्रमणाची भीती वाढली आहे. ही बाब पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावून सर्व मार्केट एक दिवसाआड सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे पालन करणे अनिवार्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची प्रतिलिपी पाठवीत असल्याचे मोटवानी यांनी सांगितले.