शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
5
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
6
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
7
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
8
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
9
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
10
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
11
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
12
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
13
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
14
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
15
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
16
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
17
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
18
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
19
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
20
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय

भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार? माजी आमदार पारवेंचा सवाल

By योगेश पांडे | Updated: July 28, 2025 18:18 IST

महसूलमंत्री बावनकुळेंना लिहिले पत्र : कुहीच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही काळापासून भाजपमध्ये इनकमिंगचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अनेक जुन्या कार्यकर्त्यांमध्ये हातातील संधी हिरावल्या गेल्याची खंत होती. मात्र पक्षशिस्तीच्या नावाखाली ही सल कुणीही सार्वजनिकपणे बोलून दाखवत नव्हते. माजी आमदार सुधीर पारवे यांनी या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांच्या मनातील भावना उघडपणे मांडल्या आहेत. पक्षातील प्रत्येक निर्णयात, प्रत्येक निवडीमध्ये त्यांचा मान राखला गेला पाहिजे व त्यांचा विचार झालाच पाहिजे, अशी त्यांनी भूमिका मांडली आहे. त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रच लिहून पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचा विचार कोण करणार, असा सवाल केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता व माजी आमदार म्हणून सलग दहा वर्षे आमदार म्हणून मी जनतेची सेवा केली आहे.मात्र, आज मनात जुन्या कार्यकर्त्यांबाबत एक व्यथा आहे. पक्षाच्या उभारणीत ज्यांनी दिवस-रात्र झिजून घाम गाळला, त्या जुन्या व सामान्य कार्यकर्त्यांचा विचार कुणी करावा, असा सवाल पारवे यांनी उपस्थित केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून झटणारे, दिवसरात्र एक करून काम करणारे, निस्वार्थीपणे पक्षासाठी आयुष्य घालवणारे ज्येष्ठ व प्रामाणिक कार्यकर्ते हेच या पक्षाचे खरे आधारस्तंभ आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात पक्षाविषयी आदर टिकवायचा असेल, तर त्यांच्या श्रमांना सन्मान द्यावा लागेल. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनातील हळहळ आपण जाणून घ्यावी व त्या जुन्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यावा. बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आणि पक्षातील वरिष्ठ म्हणून याबाबत ठाम निर्णय घ्यावा. कुही तालुक्यातील समन्वय समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मला नव्हे तर एखाद्या जुन्या, निष्ठावान कार्यकर्त्याला द्यावी, अशी भूमिका पारवे यांनी पत्रातून मांडली.

टॅग्स :nagpurनागपूरSudhir Parveसुधीर पारवेBJPभाजपा