राजोल्यात कोण मारणार मैदान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST2021-07-03T04:07:25+5:302021-07-03T04:07:25+5:30

ठवकर यांना भाजपकडून पुन्हा संधी कुही : कुही तालुक्यात राजोला जिल्हा परिषद सर्कल तर सिल्ली व तारणा या पंचायत ...

Who will play in Rajolya? | राजोल्यात कोण मारणार मैदान?

राजोल्यात कोण मारणार मैदान?

ठवकर यांना भाजपकडून पुन्हा संधी

कुही : कुही तालुक्यात राजोला जिल्हा परिषद सर्कल तर सिल्ली व तारणा या पंचायत समिती गणांत पोटनिवडणूक होत आहे. शुक्रवारी येथे राजोला सर्कलमधून भाजपचे बाळू ठवकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी ५ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अल्प कालावधी शिल्लक असतानाच राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रियाही अंतिम टप्प्प्यात आहे. राजोला सर्कलवर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. या सर्कलमध्ये तीन वेळा श्यामबाबू दुबे यांनी नेतृत्व केले आहे. त्यानंतर येथे भाजपमधून बाहेर पडलेले अरुण हटवार हे काँग्रेसमध्ये आल्यावर त्यांच्या पत्नी येथे विजयी झाल्या होत्या. मात्र दीड वर्षापूर्वीच्या निवडणुकीत येथे भाजपचा विजय झाला होता. त्यामुळे ठवकर हे सर्कल कायम ठेवणार का, याकडे लक्ष लागले आहे. गतवेळी येथे काँग्रेसचे अरुण हटवार यांचा निसटता पराभव झाला होता. दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत कुही तालुक्यात मांढळ सर्कल सोडता तिन्ही जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. या अगोदरच्या पंचवार्षिक मध्ये कुही-तितुर जिल्हा परिषदेचे क्षेत्र सोडता इतर तिन्ही क्षेत्रात काँग्रेसचे सदस्य होते, हे विशेष. त्यामुळे राजोला सर्कलमध्ये काँग्रेस पुन्हा हटवार यांनी संधी देते का, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Who will play in Rajolya?