शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कुणाला मिळणार भाजपची उमेदवारी ? शनिवारी कोअर कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 23:05 IST

विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. शिवाय निवडणूकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशीदेखील संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठळक मुद्देइच्छुक उमेदवारांसमवेतदेखील साधणार संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी विधानसभानिवडणूकांच्या भारतीय जनता पक्षामध्ये तयारीला सुरुवात झाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत शनिवारी भाजपच्या शहर कार्यकारिणीच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत शहर संघटनेचा आढावा तर घेण्यात येणार आहेच. शिवाय निवडणूकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांशीदेखील संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.लोकसभा निवडणूकांनंतर भाजपातर्फे शहरभरात नवीन सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आले. यादरम्यान नवीन मतदारांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. याशिवाय बूथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख व पेजप्रमुख या योजनांवरदेखील भर देण्यात आला. विधानसभेच्या निवडणूका पुढील पंधरवड्यात कधीही जाहीर होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर निवडणूकांत शहर भाजपाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला हरीभाऊ बागडे तसेच विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर हे प्रामुख्याने उपस्थित राहतील. यावेळी ते जागावाटपासंदर्भात पदाधिकाऱ्यांची भूमिका, विधानसभानिहाय तयारी, प्रचाराचे प्रमुख मुद्दे, जास्त जोर लावण्याची आवश्यकता असलेले भाग इत्यादींचा आढावा घेतील. रविभवन येथे सकाळी ९ वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील काही मतदारसंघात विद्यमान उमेदवार बदलला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत अहे. अशा स्थितीत इच्छुक उमेदवारांचीदेखील यावेळी चाचपणी करण्यात येईल. गर्दी टाळण्यासाठी या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठराविकांना बोलाविण्यात आले असून तसे संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आले आहे. प्रदेश भाजपाकडून तशी यादीच आलेली आहे. याशिवाय कोअर कमिटीचे पदाधिकारीदेखील याला उपस्थित राहतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.सहाही मतदारसंघातील पदाधिकारी तसेच इच्छुक उमेदवारांशी यावेळी संवाददेखील साधण्यात येईल.यासंदर्भात शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना विचारणा केली असता शनिवारी बैठक होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान मुलाखती नव्हे तर पक्षसंघटनेचा आढावा व विविध महत्वाच्या मुद्द्यांवर मंथन होईल, असे त्यांनी सांगितले.शुक्रवारी येणार हरीभाऊ बागडेदरम्यान, हरीभाऊ बागडे यांचे शुक्रवारी रात्री ८.३५ वाजता मुंबई येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळवर आगमन होईल. शनिवारचा वेळ बैठकीसाठी राखीव असून दिवसभर ते पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. रात्री पुण्याकडे ते प्रयाण करतील.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा