शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक केबल टाकण्यासाठी खोदलेला रोड बुजविणार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 18:47 IST

अपघातांना निमंत्रण : काटोल - सावरगाव मार्गावरील प्रकार

सौरभ ढोरे लोकमत न्यूज नेटवर्क काटोल : कंत्राटदाराने इलेक्ट्रिक केबल टाकण्यासाठी काटोल- सावरगाव मार्गावरील शासकीय आयटीआयजवळ रोडवर आडवे खोदकाम करीत नाली तयार केली. केबल टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ती नाली मात्र बुजविली नाही. सध्या ती नाली अपघातांना निमंत्रण देत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी मूक दर्शक बनून मोठ्या अपघाताची प्रतीक्षा करीत आहेत का, असा प्रश्न वाहन चालकांसह नागरिकांनी उपस्थित केला आहे.

काटोल-सावरगाव हा मार्ग नागपूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांसोबत मध्य प्रदेशला जोडणारा असल्याने या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. काही दिवसांपूर्वी या भागात इलेक्ट्रिक केबल टाकण्याचे काम सुरू होते. त्यासाठी कंत्राटदाराने या रोडवर आडवे खोदकाम करीत खोली नाली तयार केली आणि आत केबल टाकून त्यावर थोडाफार मुरूम व माती टाकली. सध्या या ठिकाणी नाली तयार झाली आहे. या खोदकामासाठी कंत्राटदाराला नेमकी कुणी व कोणत्या अटीवर परवानगी दिली, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी शब्दही बोलायला तयार नाहीत. 

या खोदकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य व इतर अभियंत्यांकडे विचारणा केली. मात्र, कुणालाही या खोदकामाची माहिती नसल्याचे त्यांच्याशी केलेल्या चर्चेवरून लक्षात आले. त्यामुळे कंत्राटदार अथवा त्याच्या कंपनीने या खोदकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकृत परवानगी घेतली की नाही, ते खोदकाम कोणत्या कंत्राटदाराने केले, हेदेखील अभियंते सांगायला तयार नाही. दुसरीकडे, या खोदकामाची निरपेक्ष चौकशी करून दोषी कंत्राटदाराविरुद्ध पोलिसात तक्रार करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उपाययोजना शून्य ही नाली व्यवस्थित बुजवून रोड समांतर करण्याची तसदी कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही. ही नाली वाहनचालकांना दिवसा व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे नालीतून वाहन जाताच ते उसळते आणि अपघात होतात. शुक्रवारी रात्री एक दुचाकीचालक या नालीमुळे जखमी झाला. येथील छोटे-मोठे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना केल्या नाहीत.

उंटावरून शेळ्या हाकण्याच्या प्रकारया खोदकामाला परवानगी दिल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता सुमित आवळे यांनी अप्रत्यक्ष मान्य केले आहे. खोदकाम केल्यानंतर ते व्यवस्थित बुजविले की नाही, याच प्रत्यक्ष पाहणी मात्र त्यांनी अजूनही केली नाही. याच परिसरात सिमेंट काँक्रीट रोडचे काम सुरू आहे. त्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी सुमित आवळे यांच्याकडे अनेक तक्रारी केल्या. परंतु, त्यांनी या तक्रारींची घेतली नाही व बांधकामाची पाहणी केली नाही. ते उंटावरून शेळ्या हाकत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.

"हा रोड आमच्या अखत्यारीत येतो. या भागातील सिव्हर ट्रीटमेंट प्लांटसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यांना रोड खोदला असेल तर त्याची संपूर्ण देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविली आहे." - सुमित आवळे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, काटोल.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर