कोण होणार प्र-कुलगुरू?
By Admin | Updated: June 4, 2015 02:25 IST2015-06-04T02:25:38+5:302015-06-04T02:25:38+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव, बीसीयूडी संचालक यांची निवड करण्यात आली आहे.

कोण होणार प्र-कुलगुरू?
नागपूर विद्यापीठ : लवकरच संपणार प्रतीक्षा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव, बीसीयूडी संचालक यांची निवड करण्यात आली आहे. परंतु प्र-कुलगुरू कोण होणार याचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच प्र-कुलगुरूंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, औषधीविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद येवले यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी कुलगुरुपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर रिक्त पदांची पूर्तता सुरू झाली आहे. परंतु प्र-कुलगुरूपदावर अद्यापही कुणाची निवड झालेली नाही. विद्यापीठाकडून राज्यपाल कार्यालयाला नावे पाठविण्यात आली आहेत. यात डॉ. संजय ढोबळे, डॉ. मोहन काशीकर व डॉ. प्रमोद येवले यांची नावे असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर दिली. विद्यापीठातील राजकारण लक्षात घेता डॉ. येवले यांच्या नावाचीच विद्यापीठात जोरदार चर्चा आहे.