शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

कोण हा दिल्लीचा ठगबाज ? नागपूरच्या कापड विक्रेत्याचे आठ लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 19:29 IST

२५ लाखांचे कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात एका कापड विक्रेत्याने आपले आठ लाख रुपये गमविले. दिल्लीतील ठगांच्या टोळीने त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे२५ लाखांचे कर्ज देण्याचे होते आमिषबेलतरोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २५ लाखांचे कर्ज मिळविण्याच्या प्रयत्नात एका कापड विक्रेत्याने आपले आठ लाख रुपये गमविले. दिल्लीतील ठगांच्या टोळीने त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी मंगळवारी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.नरेंद्रनगरच्या गुरुदत्त कॉलनीतील गजानन महाराज मंदिराजवळ निशिकांत रामलाल शेंडे (वय ४९) राहतात. त्यांचे कपड्याचे दुकान आहे. मोठे भांडवल गुंतवून व्यापार वाढविण्याच्या प्रयत्नात असलेल्या शेंडे यांनी कमी व्याजदरात कर्ज कुठून मिळेल, त्याची चौकशी चालवली होती. एप्रिल महिन्यात त्यांना रिलायन्स कॅपिटल कॉर्पोरेशन दिल्ली या कथित वित्त पुरवठा करणाऱ्या संस्थेमार्फत केवळ ६.५ टक्के दराने सुलभरीत्या कर्ज मिळत असल्याचे कळल्याने त्यांनी कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न केले. आरोपींशी संपर्क झाल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेंडे यांना कागदपत्रे पाठविली. ती बघितल्यानंतर स्वत:चे नाव अजय आणि अमन माथुर सांगणारे दोन भामटे त्यांच्या एका महिला साथीदारासह शहानिशा करण्याच्या नावाखाली १८ एप्रिलला शेंडे यांच्या घरी पोहचले. तेथे त्यांनी शेंडे यांना २५ लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. त्यानंतर प्रारंभी १ लाख, २५ हजारांची फिक्स डिपॉजिट मागितली. ती दिल्यानंतर पुन्हा १ लाख, ७५ हजारांची सुरक्षा ठेव मागितली. पुढे वेगवेगळ्या नावाने आरोपी शेंडे यांना रक्कम आरटीजीएस करायला लावू लागले. अशा प्रकारे २५ लाखांच्या कर्जासाठी ८ लाख, १३ हजार रुपये आरोपींच्या खात्यात जमा केल्यानंतरही त्यांच्याकडून रकमेची मागणी सुरूच राहिली. त्यामुळे शेंडे यांना शंका आली. त्यांनी नातेवाईक तसेच आपल्या विश्वासू सहकाºयांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर बेलतरोडी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलीस निरीक्षक दिलीप साळुंके यांनी या प्रकरणाची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर मंगळवारी भादंविच्या कलम ११९, ४२०, ३४ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६६ (क, ड) अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.फसवणुकीची ‘सुलभ’ पद्धतलॉटरी लागली, गिफ्ट पाठवायचे आहे, नोकरी उपलब्ध आहे, असे सांगून ठिकठिकाणचे ठगबाज संबंधित व्यक्तींना मेल किंवा मेसेज पाठवितात. अनेकदा फोनही करतात. संभाषण कौशल्याच्या बळावर ते संबंधिताला जाळ्यात ओढतात. त्यानंतर मोहिनी घातल्यासारखे ‘सुलभ’ पद्धतीने ते संबंधित व्यक्तीला त्यांच्या खात्यात रक्कम भरायला भाग पाडतात.

 

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजी