‘स्थानिक स्वराज्य’वर कुणाचे राज्य ?
By Admin | Updated: June 5, 2015 02:30 IST2015-06-05T02:30:05+5:302015-06-05T02:30:05+5:30
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने शहर

‘स्थानिक स्वराज्य’वर कुणाचे राज्य ?
कमलेश वानखेडे नागपूर
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने शहर व जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय खलबते होणार आहे. सहा महिन्यांनी डिसेंबर २०१५ मध्ये निवडणूक होऊ घातली असली तरी इच्छुकांनी आतापासून रणनीती आखणे सुरू केले आहे. सध्या ही जागा काँग्रेसचे आ. राजेंद्र मुळक यांच्या ताब्यात आहे. मात्र, केंद्र व राज्यात असलेली सत्ता, महापालिका, जिल्हा परिषद व नगर परिषदेतील संख्याबळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारांवर ‘वचक’ निर्माण करून ही निवडणूक जिंकण्याची तयारी भाजपने चालविली आहे. मात्र, दावेदारांची लांबलचक यादी भाजपची डोकेदुखी वाढविणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर येत्या काळात कोण राज्य करणार, हे आत्ताच सांगणे कठीण झाले आहे.
२००४ मध्ये भाजपकडून या मतदारसंघात निवडून आलेले सागर मेघे यांनी राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या रिक्त झालेल्या जागेवर भाजपने अशोक मानकर यांना संधी दिली. मानकर यांनी काँग्रेसचे तत्कालीन हेवीवेट नेते अनंतराव घारड यांना मोठ्या फरकाने मात दिली होती.