शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

कोण म्हणतो नागपूर प्रदुषित आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:34 IST

जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या काही शहरांसह नागपूरचाही उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर केला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पर्यावरण तज्ज्ञांनी मात्र डब्ल्यूएचओच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. भारतीय संस्थेने दोन वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणाद्वारे केवळ हवेतील धुलिकणांच्या आधारे डब्ल्यूएचओने नागपूरला प्रदूषित शहराचा ठपका ठेवल्याने या दाव्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ठळक मुद्देना डेटा, ना अ‍ॅनालिसिस : डब्ल्यूएचओच्या दाव्यावर पर्यावरण तज्ज्ञांचा आक्षेप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताच्या काही शहरांसह नागपूरचाही उल्लेख जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर केला असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पर्यावरण तज्ज्ञांनी मात्र डब्ल्यूएचओच्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. भारतीय संस्थेने दोन वर्षापूर्वी केलेल्या सर्वेक्षणाद्वारे केवळ हवेतील धुलिकणांच्या आधारे डब्ल्यूएचओने नागपूरला प्रदूषित शहराचा ठपका ठेवल्याने या दाव्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.ग्रीन व्हिजील संस्थेचे कौस्तुभ चटर्जी यांनी लोकमतशी बोलताना प्रदूषित शहराबाबत डब्ल्यूएचओद्वारे केलेल्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला. वास्तविक केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) ने कोणत्याही ठिकाणच्या प्रदूषणाच्या स्तराबाबत मानके निर्धारीत केली आहेत, ज्यामध्ये धोक्याचा स्तर प्रदूषण पसरविणाऱ्या १२ घटकांवर अवलंबून असतो. यानुसार हवेतील सल्फर डायआॅक्साईड, नायट्रोजन डायआॅक्साईड, ओझोन, कॉर्बन मोनॉक्साईड, अमोनिया, बेन्झीन या वायुंसह अर्सेनिक, निकेल व लेडसारखे जड धातू तसेच धुलिकण (सस्पेंडेड पार्टीकुलेट मॅटर) यांची मात्रा मोजली जाते. या घटकांची मात्र हवेत अधिक असेल तेव्हाच एखाद्या शहराला प्रदूषित असल्याचा ठपका ठेवला जातो. डब्ल्यूएचओने जाहीर केलेल्या यादीनुसार नागपूरात धुलिक णांचा स्तर वगळता इतर घटकांची मात्रा गृहीतच धरली गेली नसल्याचे दिसून येते. त्यामुळे नागपूर प्रदूषित असल्याचा दावा सत्य कसा मानायचा हा प्रश्न निर्माण होतो.प्रदूषणाच्या दाव्यातील फोलपणाडब्ल्यूएचओच्या वेबसाईटनुसार नागपूर शहर प्रदूषित असल्याचा केलेला दावा केवळ धुलिकण म्हणजेच पार्टीकुलेट मॅटर (पीएम) च्या सर्वेक्षणावर आधारीत आहे. वास्तविक महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) ने नागपूर शहराचे प्रदूषण मोजण्यासाठी पाच स्टेशन निर्धारीत केले आहेत. यामध्ये सिव्हील लाईन्स, विभागीय आयुक्त कार्यालय, उत्तर अंबाझरी मार्ग, सदर आणि हिंगणा रोडवरील स्टेशनचा समावेश आहे. हे पाच स्टेशन म्हणजे पूर्ण शहर म्हणता येणार नाही. हे सर्वेक्षण सीपीसीबीकडे पाठविले जाते व त्यांच्या संकेतस्थळावर अपलोड केले जाते. डब्ल्यूएचओने स्वत: सर्वेक्षण न करता धुलिकणांचा डेटा सीपीसीबीच्या संकेतस्थळावरून घेतला आहे. यातही विशेष बाब म्हणजे हे सर्वेक्षण २०१६ मध्ये घेतलेले असून २०१८ मध्ये यात बदलाची शक्यता नाकारता येत नाही. हा डेटा केवळ एका केंद्राचा असल्याने याच्या सत्यतेचा दावा करणे योग्य नाही, असे चटर्जी म्हणाले.तांत्रिक डेटाही अपुराडब्ल्यूएचओने धुलीकणांच्या स्तरावरून नागपूरवर प्रदूषणाचा ठपका ठेवला आहे. यानुसार शहराच्या हवेत पार्टीकुलेट मॅटर (पीएम-२.५) चे प्रमाण ६० मायक्रोग्रॅम प्रती घनमीटरच्या खाली असायला हवे. नागपूरचे प्रमाण ८४ आहे. दुसरीकडे शहरात पीएम-१० चे प्रमाण ८६ मायक्रोग्रॅम प्रती घनमीटर दर्शविले आहे. मात्र धोक्याची पातळी ही १०० च्या वरची आहे. या दोन्हीचे प्रमाण इतर शहरातच अधिक आहे. शिवाय एसओ-२, एनओ-२, ओझोन, कॉर्बन मोनाक्साईड, अर्सेनिक, निकेल अशा प्रदूषणास कारणीभूत घटकांचा उल्लेख नाही व एमपीसीबीच्या डेटानुसार या सर्व घटकांचे स्तर प्रदूषणाच्या पातळीपेक्षा कमी आहेत. असे असताना नागपूरला प्रदूषित घोषित करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.वास्तविक विदेशातील गुंतवणूकदारांकडून नागपूरला पसंती दिली जात आहे. मात्र कोणत्याही शहरात गुंतवणूक करताना पर्यावरण व प्रदूषणाच्या स्थितीकडे गंभीरतेने लक्ष दिले जाते. प्रदूषित शहरात गुंतवणूक करण्यास कुणी पुढे येत नाही. कारण त्यांच्या ब्रॅन्डची इमेज डॅमेज होण्याची भीती असते. कुणी यायला तयारही झाले तर त्यांचा प्रदूषण नियंत्रणाचा व साधनांचाही खर्च तिपटीने वाढतो. त्यामुळे अपुºया माहितीच्या आधारे केलेल्या दाव्याला महत्त्व देउऊ नये. हे केवळ गुंतवणूक थांबविण्यासाठी भारतीय शहरांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. कौस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजील

टॅग्स :pollutionप्रदूषणnagpurनागपूर