शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

नागपुरात होणारा एअरबस प्रकल्प गुजरातला कुणी पळवला?

By गणेश हुड | Updated: November 7, 2024 16:47 IST

शरद पवार यांचा सवाल : महाविकास आघाडीची पंचसूत्रीची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  नागपुरात उद्योग यावे, येथील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न होणे अपेक्षीत आहे.  परंतु महाराष्ट्रात होणारा 'फॉक्सकॉन-वेदांता' प्रकल्प गुजरातला गेला, नागपूर येथे होणारा सी-२९५ लष्करी ट्रान्सपोर्ट एअरबस हा प्रकल्प गुजरातला कुणी पळवला. प्रधानमंत्री एका राज्याची हिताची भूमिका घेत आहे, त्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला. गुरुवारी पूर्व नागपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्या निवडणूक प्रचारासाठी आयोजित सभेत शरद पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. व्यासपीठावर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, माजी मंत्री अनिल देशमुख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजीत वंजारी, रामकिसन ओझा, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितेश कराळे, शेखर सावरबांधे, तानाजी वनवे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

केंद्र सरकारणे जाहीर केलेल्या आर्थिक आकडेवारीत महाराष्ट्र सहाव्या नंबरवर आहे. महिलांची स्थिती  वाईट आहे. नागपूर आणि आजूबाजूमधून ६०० महिला गायब झाल्यात. 

राज्यसरकारची जवाबदारी असूनही महिला संरक्षण देऊ शकत नाही. शेतकरी हित बघत नाही, युवकांना रोजगारात देऊ शकत नाही. यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तन करून भाजपच्या हातून सत्ता काढणार असल्याचे शरद पवार म्हणाले. माजी मंत्री अनील देशमुख, आमदार विकास ठाकरे, अभिजीत वंजारी, दुनेश्वर पेठे, नितेश कराळे आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. 

पंचसूत्रीच्या अंमलबजावणीची गॅरंटीमहाविकास आघाडी सरकार आल्यास महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला ३००० रुपये तसेच महिला व मुलींना मोफत बस प्रवास लागू करणार.  शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन देणार,  जातनिहाय जनगणना करणार, ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करणार. २५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा व मोफत ओषधे दिली जाणार. तसेच  बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ४००० रुपयांपर्यंत मदत दिली जाणार आहे. या पंचसूत्रीच्या अंमलबजावणीची गॅरंटी देतो, अशी ग्वाही शरद पवार यांनी दिली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारnagpurनागपूर