७५ वॉर्ड असताना २३३ कर्मचारी अन् १५१ वॉर्डसाठी १४३ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:07 IST2021-01-02T04:07:49+5:302021-01-02T04:07:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने टॅक्स वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. थकबाकी ...

७५ वॉर्ड असताना २३३ कर्मचारी अन् १५१ वॉर्डसाठी १४३ !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेची बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने टॅक्स वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. थकबाकी वसुलीसाठी अभय योजना आणली आहे. परंतु दुसरीकडे महापालिकेचे ७५ वॉर्ड असताना मालमत्ता कर विभागात २३३ कर्मचारी कार्यरत होते. आता शहराचा विस्तार झाल्याने वॉर्डची संख्या १५१ झाली आहे. परंतु आज या विभागात फक्त १४३ कर्मचारी कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत टॅक्स वसुली कशी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मागील १५ वर्षापूर्वी ७५ वॉर्ड असताना मनपाच्या आस्थापनेनुसार मालमत्ता विभागाच्या आस्थापनेवर २३३ कर्मचारी होते. आता वॉर्डांची संख्या १५१ झाली आहे. शहरातील घरांची संख्या ३.५० लाखावरून ६.५० लाखावर गेली आहे. दुसरीकडे मालमत्ता विभागात सध्या १४३ कर्मचारी कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या विभागातील ६४ कर्मचारी दुसऱ्या विभागात कार्यरत असून, ३४ पदे रिक्त आहेत. कर वसुलीसाठी ६४ कर्मचाऱ्यांना मूळ विभागात परत पाठविण्याची गरज आहे. परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.
मनपात वर्ग १ ते ४ मिळून ११ हजार ९६१ पदे मंजूर आहेत. यापैकी ७ हजार पदे भरलेली असून, ४ हजार ११८ पदे रिक्त आहेत. त्यात दर महिन्याला ३० ते ३५ कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. यामुळे रिक्त पदांची संख्या वाढतच आहे. यात मालमत्ता कर विभागाचाही समावेश आहे.
.............
कर विभागात कार्यरत कर्मचारी
पद मंजूर पदे कार्यरत रिक्त पदे दुसऱ्या विभागात कार्यरत
कर अधीक्षक १ १ ० ०
सहा. अधीक्षक ३ ३ ० ०
राजस्व निरीक्षक १८ ३ १५ १
कनिष्ठ निरीक्षक २६ २५ १ ३
ज्येष्ठ श्रेणी लिपिक १ ० १ ०
उच्च श्रेणी लिपिक ३ २ १
कनिष्ठ लिपिक १५ १५ ० ०
कर संग्राहक १६० १४८ १२ ५४
वाहन चालक १ १ ०
चपराशी ५ १ ४ ०
एकूण २३३ १९९ ३४ ६२
....