शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी भागात लाच घेताना सरपंचाच्या वडिलासह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:10 IST

पांदण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केल्यानंतर बिलापोटी प्राप्त झालेल्या रकमेतून काम मिळवून दिल्याची बतावणी करीत ४० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने अटक केली.

ठळक मुद्दे४० हजार रुपयांची लाच : सरपंच फरार

आॅनलाईन लोकमतनागपूर : पांदण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केल्यानंतर बिलापोटी प्राप्त झालेल्या रकमेतून काम मिळवून दिल्याची बतावणी करीत ४० हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो) पथकाने अटक केली. यातील एका आरोपीचा शोध सुरू असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ग्रामसेवक व सरपंचाच्या वडिलांचा समावेश असून, फरार आरोपीमध्ये सरपंचाचा समावेश असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. ही कारवाई पारशिवनी तालुक्यातील आमगाव येथे शनिवारी दुपारी करण्यात आली.हरीष तुकाराम आकरे (ग्रामसेवक) व मारोतराव बावनकुळे (सरपंचाचे वडील) अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोर आरोपींची नावे असून, आशिष मारोतराव बानवकुळे (सरपंच) असे फरार आरोपीचे नाव आहे. बाभूळवाडा ग्रटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आमगाव येथील पांदण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले. या कामाच्या बिलापोटी फिर्यादी कंत्राटदारास (रा. आमगाव, ता. पारशिवनी) २ लाख ९३ हजार ६७४ रुपयांचा धनादेश (चेक) देण्यात आला. सदर काम मिळवून दिल्यामुळे सरपंच आशिष बावनकुळे व त्याच्या वडिलांना प्रत्येकी १० टक्के आणि ग्रामसेवक हरीश आकरे याला पाच टक्के रक्कम देण्याची मागणी आरोपींनी फिर्यादीस केली. ही रक्कम ४० हजार रुपये होते. मात्र, ही रक्कम देण्याची फिर्यादीची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने या संदर्भात एसीबीच्या नागपूर कार्यालयात रीतसर तक्रार नोंदविली.एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सुरुवातीला या तक्रारीची शहानिशा केली आणि त्यात तथ्य आढळून येताच सापळा रचला. ठरल्याप्रमाणे फिर्यादीने आशिष बावनकुळे, मारोतराव बावनकुळे व हरीश आकरे या तिघांना एकूण ४० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी तिघांनाही आमगाव येथील  ग्रामपंचायत कार्यालयात बोलावले. मारोतराव बावनकुळे व हरीश आकरे या दोघांनी सदर रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. आशिष बावनकुळे तिथे न आल्याने त्याला अटक करण्यात आली नाही.या प्रकरणी पारशिवनी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनात एसीबी पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, सुनील कळंबे, रवी डहाट, मंगेश कळंबे, गजानन गाडगे, सरोज बुधे, परसराम साही, शिशुपाल वानखेडे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :nagpurनागपूरsarpanchसरपंच