शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
3
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
4
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
5
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
6
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
7
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
8
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
9
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
10
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
11
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
12
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
13
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
14
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
15
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
16
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
17
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
18
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
19
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
20
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड

‘सीसीटीव्ही’तील ‘फुटेज’ गेले कुठे ?

By admin | Updated: March 10, 2016 03:31 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागाला सुरुंग लागल्याचे धनादेश ‘रॅकेट’मुळे उघडकीस आले.

विद्यापीठातील धनादेश ‘रॅकेट’ : वित्त विभागाच्या कारभारातील आणखी एक फोलपणानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागाला सुरुंग लागल्याचे धनादेश ‘रॅकेट’मुळे उघडकीस आले. संबंधित विभागात येऊन तिऱ्हाईत व्यक्ती दुसऱ्याच व्यक्तीचा धनादेश घेऊन गेल्यावरदेखील अधिकाऱ्यांना जाग आली नाही. संबंधित व्यक्ती ‘सीसीटीव्ही’त कैद झाली असण्याची दाट शक्यता असताना ५ फेब्रुवारी अगोदरचे ‘फुटेज’च दिसत नसल्याची बाब समोर आली आहे. खुद्द विद्यापीठाच्या कुलगुरूंनीच ही माहिती दिली असून यामुळे वित्त विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठाच्या बँक खात्यातून बनावट ‘चेक’च्या माध्यमातून ३१ लाख रुपयांची रक्कम काढण्यात आल्याने खळबळ माजली होती. हा प्रकार उघडकीस येऊन अवघे २४ तासदेखील झाले नसताना वित्त विभागातून आणखी दोन धनादेश गायब झाल्याची बाब समोर आली होती. रुपेश रणदिवे या कंत्राटदाराच्या नावाने तयार झालेले २ लाख ३ हजारांचे दोन धनादेश १ फेब्रुवारी रोजी परस्पर तिऱ्हाईत व्यक्तीने वित्त विभागातून नेले आणि ते वटविले. याबाबत पोलिसांमध्येदेखील तक्रार करण्यात आली होती.काही कालावधीपूर्वी नागपूर विद्यापीठाच्या विविध विभागांसह वित्त विभागातदेखील ‘सीसीटीव्ही’ लावण्यात आले होते. यासंदर्भात ‘सीसीटीव्ही’च्या माध्यमातून तपासाला दिशा मिळेल अशी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अपेक्षा होती. परंतु नुकत्याच समोर आलेल्या माहितीने अधिकाऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी पडले आहे.वित्त विभागातील ‘सीसीटीव्ही’चे ५ फेब्रुवारीनंतरचेच ‘फुटेज’ उपलब्ध आहे. त्याअगोदरचा सर्व ‘डाटा’ दिसत नसल्याची माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. नेमका त्याच कालावधीतील ‘फुटेज’ कसे काय गायब झाले हे आश्चर्यचकित करणारे असून यासंदर्भात तांत्रिक मदत घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे या प्रकाराबाबत मला आत्ताच माहीत पडले असल्याचे कुलगुरूंनी सांगितले. केवळ परिसरात ‘सीसीटीव्ही’नागपूर विद्यापीठाच्या जवळपास सर्वच विभागांमध्ये ‘सीसीटीव्ही’ लागलेले आहेत. प्रशासकीय इमारती व परीक्षा विभागामध्ये तर कार्यालयांच्या आतदेखील ‘सीसीटीव्ही’ लागलेले आहेत. वित्त विभाग हा विद्यापीठाचा महत्त्वाचा विभाग आहे. असे असताना येथे केवळ प्रवेशद्वाराच्या बोळीमध्ये ‘सीसीटीव्ही’ आहे. प्रशासनाकडून इतका मोठा हलगर्जीपणा कसा करण्यात आला हा प्रश्नच आहे. महत्त्वाची बाब म्हणजे विद्यापीठाच्या सर्वच ‘सीसीटीव्ही’चे ‘फुटेज’ हे सहा महिने ते दोन वर्ष या कालावधीपर्यंत सांभाळून ठेवता येते. असे असताना वित्त विभागात नेमका असा कुठला तांत्रिक अडथळा आला हेदेखील एक कोडेच आहे.(प्रतिनिधी)\दोन लाख परत मिळणे अशक्यदरम्यान, विद्यापीठाने या ‘रॅकेट’च्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या वित्तीय समितीची बुधवारी पहिली बैठक झाली. विद्यापीठाचा बनावट धनादेश तयार करून ३१ लाख रुपयांची रक्कम काढण्यात आली असली तरी हा प्रकार बँकेच्या हलगर्जीपणामुळे झाला आहे. त्यामुळे ती रक्कम परत करणे ही बँकेची जबाबदारी आहे. परंतु दोन लाख रुपयांचा धनादेश विद्यापीठातून नेण्यात आला होता. त्यामुळे जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत ती रक्कम थेट परत मिळणे अशक्य असल्याचे मत समितीच्या सदस्यांनी व्यक्त केले. समितीला कामकाजाचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. शिवाय विद्यापीठाच्या वित्तीय कामकाजात कुठले बदल हवे आहेत, धनादेशांची प्रणाली पूर्णपणे बंद करायची आहे का इत्यादींसंदर्भात सूचना देण्याची विनंती समितीला करण्यात आली असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.