शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कुठे जीवदान, कुठे पिकांची माती; १० हजार घरांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 07:45 IST

या पावसाने तहानलेल्या मराठवाड्याला दिलासा दिला असून दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

राज्याचा काही भाग अजूनही पावसासाठी आसुसलेला असताना शनिवारी जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान केले आहे.  नांदुरा (जि. बुलढाणा) येथे पुरात वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणातून पाणी सोडल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे.  दरम्यान, नागपुरातील पूर ओसरला असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या पावसाने तहानलेल्या मराठवाड्याला दिलासा दिला असून दमदार पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे.

नागपुरात पुराने ५ जणांचा मृत्यू, १० हजार घरांचे नुकसान

नागपूर  : नाग नदीला आलेल्या महापुरामुळे नागपुरातील सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून १४ जनावरेही दगावली. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.   शुक्रवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या अतिवृष्टीत नागपूरकरांना मोठा फटका बसला. अंबाझरी तलाव पाण्याचा ओव्हर फ्लो होऊन हे पाणी नागनदीत प्रचंड प्रवाहाने शिरले. नदीकाठावरील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे अन्नधान्यासह इतर साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.  या सर्व घटनाक्रमात पाच जणांचा मृत्यू झाला. यात मीराबाई पिल्ले (७०), संध्या ढोरे (८०), संजय गाडेगावकर (५२), कृष्णकुमार लेखराम बरखंडी (२१) आणि एक अनोळखी या मृतांचा समावेश आहे.

रविवारी दुपारपासून नुकसानीच्या पंचनाम्याला सुरुवात झाली. महानगरपालिकेचे ६० कर संग्राहक, १५ महसूल निरीक्षक, १० सहायक अधीक्षक यांची

टीम जिल्हा प्रशासनाच्या दिमतीला आली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी  

n उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नुकसानीचा आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश जारी केले. त्यानंतर फडणवीस यांनी रविवारी सकाळी नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. n काही वस्त्यांना भेट देऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच घरात चिखलामुळे झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली. भविष्यात अशा घटना टाळण्यात येतील, असेही नागरिकांना त्यांनी सांगितले.

टॅग्स :CropपीकCrop Insuranceपीक विमाRainपाऊस