‘पीएफ’चे व्याज गेले कुठे?

By Admin | Updated: June 2, 2017 02:15 IST2017-06-02T02:15:46+5:302017-06-02T02:15:46+5:30

सध्या संपूर्ण देशातील नोकरदार त्रस्त आहेत. जून महिना सुरू झाला आहे. मात्र त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात

Where is the interest of PF? | ‘पीएफ’चे व्याज गेले कुठे?

‘पीएफ’चे व्याज गेले कुठे?

नोकरदार त्रस्त : ‘सॉफ्टवेअर अपडेट’चे केले जातेय कारण समोर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सध्या संपूर्ण देशातील नोकरदार त्रस्त आहेत. जून महिना सुरू झाला आहे. मात्र त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात आतापर्यंत वर्ष २०१६-१७ च्या व्याजाची रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे कर्मचारी चिंतेत आहेत. यावर्षी असे का झाले असा प्रश्न त्यांना पडला आहे.

लोकमतने या संदर्भात चौकशी केली असता ही असे उघडकीस आले की, मे च्या पंधरवड्यात पीएफच्या व्याजाची रक्कम अपलोड केली जाते. एसएमएसच्या माध्यमातून याची माहितीसुद्धा दिली जाते. परंतु यावर्षी असे झालेच नाही. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमुळे नोकरदार वर्गाला या समस्येला सामोरे जावे लागले आहे.
सूत्रानुसार केंद्र सरकार कामगार-कर्मचाऱ्यांशी संबंधित सर्व संस्थांना (उदा. पीएफ, ईएसआयसी) ची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने युनिकोड पोर्टल तयार करीत आहे. यासाठी पीएफ कार्यालय आणि त्याच्या वेबसाईटला युनिकोडमध्ये बदलविले जात आहे. हे काम डिसेंबरपासून सुरू झाले आहे. मे महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. परंतु ते अजूनही पूर्ण होऊ शकलेले नाही. आता असे सांगितले जात आहे की, जूनच्या पंधरवड्यात हे काम पूर्ण करून व्याजाच्या रकमेला पीएफ खात्यामध्ये अपलोड केले जाईल.
सॉफ्टवेअर अपडेट होत असल्यामुळे पीएफ आॅफिसमधील अनेक वेबसाईट सुद्धा उघडत नाही. त्यावर केवळ निर्माणाधीन असल्याचा संदेश दाखविला जात आहे. या संदर्भात पीएफ आयुक्त अनिमेश मिश्रा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क होऊ शकला नाही.

डिसेंबरमध्ये झाली होती
८.६५ टक्केची शिफारस
ईपीएफ बोर्डाने १९ डिसेंबर रोजी वर्ष २०१६-१७ साठी पीएफच्या रकमेवर ८.६५ टक्के व्याज देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. केंद्राने १६ एप्रिल रोजी यावर शिक्कामोर्तब केले. मागील दोन वर्षांपासून ८.८ टक्के व्याज दिले जात होते, हे विशेष.

Web Title: Where is the interest of PF?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.