शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
3
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
5
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
6
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
7
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
8
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
9
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
10
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
11
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
12
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
13
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
14
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
15
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
16
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
17
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
18
‘निवडणूकपूर्व’साठी राष्ट्रवादी काॅंग्रेस (शरद पवार) अनुत्सुक; निवडणुकीनंतर युती करण्याला मात्र पसंती
19
४८ हजार जणांनी म्हटले, दुबार मतदान करणार नाही
Daily Top 2Weekly Top 5

श्रवणीय सुरावटींचा ‘ये कहां आ गये हम...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 00:42 IST

प्रतिभावान शायर, संगीतकार व पार्श्वगायकांनी अजरामर केलेल्या गीतांचे कठीण आव्हान सहजपणे पेलणाऱ्या नवीन कलावंतांचा ‘ये कहां आ गये हम...’ हा श्रवणीय कार्यक्रम मंगळवारी सायंटिफिक सभागृहात सादर करण्यात आला. या हौशीकलावंतांद्वारे प्रत्येकाच्या मनातील अमीट अशा गीतांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांच्या मनातही शीर्षकाच्या ओळींप्रमाणे भावना निर्माण केली.

ठळक मुद्देहिंदी चित्रपट गीतांचे इंद्रधनुषी सादरीकरण

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतिभावान शायर, संगीतकार व पार्श्वगायकांनी अजरामर केलेल्या गीतांचे कठीण आव्हान सहजपणे पेलणाऱ्या नवीन कलावंतांचा ‘ये कहां आ गये हम...’ हा श्रवणीय कार्यक्रम मंगळवारी सायंटिफिक सभागृहात सादर करण्यात आला. या हौशीकलावंतांद्वारे प्रत्येकाच्या मनातील अमीट अशा गीतांच्या सादरीकरणाने मंत्रमुग्ध झालेल्या श्रोत्यांच्या मनातही शीर्षकाच्या ओळींप्रमाणे भावना निर्माण केली.कला आराधना व नूपुर संगीततर्फे सायंटिफिक सभागृह येथे हा स्वरमाधुर्य निर्माण करणारा कार्यक्रम मंगळवारी सादर झाला. भावविभोर करणाऱ्या अमीट गीतांचे संगीत संयोजन रचना पाठक-खांडेकर यांचे व निर्मिती संकल्पना मैथिली मगरे यांची होती. श्रोत्यांच्या कानामनावर गारुड असणाऱ्या मधूर स्वरांच्या सुवर्णस्पर्शी गीतांचे सादरीकरण करणाऱ्या नवोदित विद्यार्थी गायकांचे कौतुक करावे अशीच ही अनुभूती होती. लोकप्रिय चित्रपटातील गाजलेल्या २७ गीतांच्या सादरीकरणाने हा कार्यक्रम इंद्रधनुषी अनुभव देणारा ठरला. सूरज मालवीय, डॉ. ममता खांडेकर, मुश्ताक शेख, रचना पाठक-खांडेकर, महेश मगरे, चिन्मय पाठक, बालगायक परितोष मगरे, वैशाली शिरसाठ, करुणा खांडेकर, नंदीनी सयाम, नंदा तायडे, कांचन भालेकर, सायली पवार या गायक कलावंतांनी अतिशय ताकदीने गाणी सादर केली.सभागृहातील प्रसन्न वातावरणात सामूहिकरीतीने सादर झालेल्या ‘ज्योती कलश छलके...’ या भावगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर ‘एक अजनबी हसीना से..., पुकारता चला हूं मै..., पल पल दिल के पास..., ओ साथी रे..., जाईये आप कहां जायेंगे..., सोला बरस की बाली उमर को..., परदे मे रहने दो..., आईये मेहरबा..., अफसाना लिख रही हूं..., दिल है छोटासा...’ ही एकाहून एक सरस गीतांनी श्रोत्यांना संमोहित केले. ममता खांडेकर यांनी विविध गायकांची मेलोडी मिक्स करून गायली. मुश्ताक शेख व रचना यांचे शीर्षक गीत आणि ममता यांच्यासोबतचे ‘पन्ना की तमन्ना...’ हे युगलगीत श्रोत्यांच्या पसंतीचे ठरले. रमेश खांडेकर, रचना पाठक-खांडेकर, अशोक ठवरे, आशिष नाईक, विक्रम विझे, राहुल सोंढिया या वाद्यकलावंतांनी सुरेल साथसंगत केली. निवेदन माधवी पांडे यांनी केले.कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ कलावंत मेलोडी मेकर्स आॅर्केस्ट्राचे ओ.पी. सिंह यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भास्कर लोंढे, अनुराधा लोंढे, सना पंडित, गायिका नलिनी नाग, नगरसेवक अविनाश ठाकरे, संदीप गवई, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर