गाढविणीचे दूध कुठे मिळेल? पौष्टिकतेविषयी नागपूरकर अनभिज्ञ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:11 IST2021-08-12T04:11:42+5:302021-08-12T04:11:42+5:30

- ठरतोय थट्टामस्करीचा विषय : उपहासाचे प्रतीक ठरलेला गाढव आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

Where can I get donkey's milk? Nagpurkar ignorant about nutrition! | गाढविणीचे दूध कुठे मिळेल? पौष्टिकतेविषयी नागपूरकर अनभिज्ञ!

गाढविणीचे दूध कुठे मिळेल? पौष्टिकतेविषयी नागपूरकर अनभिज्ञ!

- ठरतोय थट्टामस्करीचा विषय : उपहासाचे प्रतीक ठरलेला गाढव आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गाढविणीच्या दुधामधील पौष्टिकतेची जाणीव जुन्या काळातील वैद्यांना होती आणि म्हणून असाध्य रोगांवर रामबाण उपचार म्हणून हे दूध रुग्णांना दिले जात होते. कालांतराने मात्र गाढव हे मूर्खपणाचे प्रतीक ठरले आणि गाढवाचे मानवाशी असलेले आरोग्यविषयक महत्त्व मागे गेले. आज गाढविणीचे दूध कुठे मिळेल, अशी विचारपूस केली असता सर्वत्र थट्टामस्करीचा विषय ठरतो आहे. विशेष म्हणजे, नागपुरात दूरदूरपर्यंत गाढव दिसेनासे झाले आहे.

चीनमध्ये गर्दभ अर्थात गाढवसंवर्धनावर भर दिला जातो, तो त्याच्या उपयुक्ततेमुळे. परिश्रमाचे प्रतीक म्हणून गौरविल्या जात असलेल्या गाढवाच्या मानवी आरोग्यविषयक दृष्टिकोनामुळेच तेथे गर्दभ संवर्धन मोठ्या प्रमाणात केले जाते. प्राणिमात्रांवर प्रेम करण्याचा संदेश देणाऱ्या व प्रत्येक प्राणिमात्रात दैवत्वाचा वास असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या भारतात मात्र गाढवाला मूर्खपणाचे प्रतीक म्हणून हिणवले जात आहे. कधीकाळी गाढव हा भारतीय समाजजीवनाचा एक अविभाज्य असा घटक होता. तो आता नागपुरात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

गाढविणीच्या दुधातील पौष्टिकता

गाढविणीच्या दुधात व्हिटॅमिन बी, बी-१२ यांची मात्रा व उष्मांक अधिक असतो. मातेच्या दुधापेक्षा गाढविणीच्या दुधामध्ये ६० टक्के अधिक व्हिटॅमिन सी हा घटक आढतो. संसर्गजन्य, जंतुजन्य रोगांपासून या दुधामुळे संरक्षण मिळते. यासोबतच दमा, सर्दी, खोकला, कावीळ आदी रोगांवर रामबाण औषध म्हणूनही गाढविणीचे दूध महत्त्वाचे ठरते. शिवाय, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे दूध महत्त्वाची भूमिका पार पाडते. एकदा हे दूध पिले की आयुष्यभर रोगप्रतिकारशक्ती वाढलेली असते, हे संशोधन डॉ. डी.एस. काटे यांनी आपल्या गाढवावरच्या शोधप्रबंधात लंडनमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत काही वर्षांपूर्वी सादर केला होता.

पाच ते सात हजार रुपये लिटर

नागपुरात गाढविणीच्या दुधाविषयी नागरिकांमध्ये अज्ञान आहे. मात्र, विदर्भातील जंगली व डोंगराळ भागात गाढविणीचे दूध विकले जाते. मराठवाड्यात गाढविणीच्या दुधाविषयी आता जनजागृती व्हायला लागल्याचे दिसून येते. साधारणत: पाच ते सात हजार रुपये लिटरपर्यंत गाढविणीचे दूध विकले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात आजघडीला ३८८ अमेरिकी डॉलर प्रतिलिटर दराने हे दूध विकले जाते.

आयुर्वेदात दुधाला महत्त्वाचे स्थान

आयुर्वेदाच्या लेखकांपैकी एक असलेल्या महर्षी वाग्भट्ट यांनी दुधाबाबत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यात सर्व प्रकारचे दूध हे आरोग्यदायी म्हटलेले आहे. गाढविणीच्या दुधाबाबत तत्कालीन आयुर्वेदात लिखित असे आढळत नाही. मात्र, आयुर्वेदात सातत्याने संशोधनांचा समावेश होत गेला. ग्रामीण भागात आयुर्वेदाची चिकित्सा करणारे अनेक वैद्य मुलांना बलिष्ठ करण्यासाठी व त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, तसेच दुर्धर आजारावर गाढविणीचे दूध देण्यास सांगत असत. या दुधाचा उष्मांक जास्त असल्याने त्याची मात्र अगदीच कमी म्हणजे दोन चमचे वगैरे, अशी असते. आज मात्र, गाढविणीच्या दुधाचा सर्वांना विसर पडलेला आहे. कोरोनाकाळात गाढविणीचे दूध महत्त्वाचे ठरू शकते.

-डॉ. हरिभाऊ मस्के, ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य

नागपुरात नामशेष होण्याच्या मार्गावर

शहरात गाढव ही प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पूर्वी कुंभार आणि वीटभट्ट्यांवर गाढवांचा वापर केला जात होता. आता ट्रान्स्पोर्टची व्यवस्था असल्याने गाढव कोणी पाळताना दिसत नाही. शहरात फार फार तर ७०-७५ गाढव असतील. शिवाय, गाढवाच्या दुधाबाबत अनभिज्ञता असल्याने दुधाचा व्यवसाय होत असल्याचे ऐकिवात नाही.

-डॉ. गजेंद्र महल्ले, पशुवैद्यकीय अधिकारी, नागपूर महानगरपालिका

Web Title: Where can I get donkey's milk? Nagpurkar ignorant about nutrition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.