कुठे गेली २० हजार झाडे?

By Admin | Updated: August 23, 2015 03:17 IST2015-08-23T03:17:29+5:302015-08-23T03:17:29+5:30

उपराजधानीला हिरवे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु वृक्षारोपणाबाबत उदासीनताच आहे.

Where are the 20,000 trees? | कुठे गेली २० हजार झाडे?

कुठे गेली २० हजार झाडे?

नासुप्र : कंपनीला नवीन झाडे लावण्याचे निर्देश
वसीम कुरैशी  नागपूर
उपराजधानीला हिरवे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु वृक्षारोपणाबाबत उदासीनताच आहे. तीन वर्षापूर्वी नासुप्रने शहरात वृक्षारोपण करण्याचे अडीचा कोटीचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले होते. परंतु करारातील शर्तीनुसार या कंपनीने शहरात २० हजार झाडे लावलेली नाही. त्यामुळे नासुप्रने कंपनीला झाडे लावण्याचे निर्देश दिले आहे. नासप्रुने २०१२ मध्ये बीव्हीजी इंडिया कंपनीला शहरात एक लाख झाडे लावण्याचे कंत्राट दिले होते. याची माहिती जाणून घेण्यासाठी नासुप्रने सामाजिक संस्थांच्या सहकार्याने सर्वे केला असता कंपनीने करारानुसार शहरात झाडे लावली नसल्याचे निदर्शनास आले. यात अनियमितता आढळून आली असून कोणत्या जातीची किती झाडे लावली याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन किती झाडे लावण्यात आली याचा हिशेब जुळत नाही.शहरातील उद्यान, शाळा, महाविद्यालये, रस्ते, मंदिराचा परिसर यासह सार्वजनिक खुल्या जागेवर झाडे लावण्यात आली होती. परंतु सर्वेक्षणात झाडे कमी असल्याचे निदर्शनास आले. झाडे कमी लावल्याने कंपनीला वृक्षारोपण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तत्कालीन उद्यान अधीक्षकांनी या संदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
झाडे लावण्याचे निर्देश
शहरात लावण्यात आलेल्या झाडाचे दीड महिन्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते. यात २० हजार झाडे कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे करारानुसार झाडे लावण्याचे निर्देश कंपनीला देण्यात आल्याची माहिती नासुप्रचे अधीक्षक अभियंता एस.एच.गुज्जलवार यांनी दिली.

Web Title: Where are the 20,000 trees?