शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:46 IST

जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन महिना लोटत आहे.आर्थिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना, योजनांच्या संदर्भात कुठलाही आढावा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी घेतला नाही. याकडे गांभीर्याने न घेतल्यास मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहणार आहे.

ठळक मुद्देआर्थिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक : लाभाच्या योजना प्रलंबित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊन महिना लोटत आहे. तर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडीला १५ दिवस होत आहेत. गेले वर्ष निवडणुकीच्या आचारसंहितेत गेले आहे. जि.प. राबविण्यात येणाऱ्या योजना मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. आर्थिक वर्ष संपायला दोन महिने शिल्लक असताना, योजनांच्या संदर्भात कुठलाही आढावा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी घेतला नाही. याकडे गांभीर्याने न घेतल्यास मोठ्या प्रमाणात निधी अखर्चित राहणार आहे.जिल्हा परिषदेच्या तिजोरीत ठणठणाट आहे़ त्यातच राज्य शासन आणि डीपीसी आणि खनिज प्रतिष्ठानच्या मिळालेला निधीही तीन निवडणुकींच्या आचारसंहितेमुळे वेळेवर खर्च होऊ शकला नाही. अद्याप सेस फंडात किती निधी शिल्लक आहे, किती निधी येणे बाकी आहे, कुठल्या योजना रखडल्यात आदींचा आढावा अजूनही घेण्यात आला नाही. जि.प.च्या सेसफंडातून शिक्षण, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, कृषी आदी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात. २०१९-२० चा ३७ कोटी २५ लाख ९१ हजारांचा अर्थसंकल्प सादर केला होता. जि.प.ला मुद्रांक शुल्क, विविध कर, पाणीपट्टी (शासकीय) अभिकरण शुल्क आदीच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत असतो. तो निधी सेसफंडामध्ये जमा होतो. यातून वैयक्तिक लाभाच्या योजनांसह इतर योजना राबविल्या जातात. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अनेक महिन्यांपर्यंत जि.प.सेसफंडामध्ये ठणठणाटच होता. यानंतर चार-पाच महिन्यांनंतर मुद्रांक शुल्काच्या स्वरूपात शासनाकडून १४ कोटीचा निधी प्राप्त झाला होता. त्यातच २०१९ मध्ये लोकसभा, विधानसभा व त्यानंतर जि.प.निवडणुकीची आचारसंहिता लागली. यामुळे सेस फंडाच्या निधीतील योजना बाधित झाल्या होत्या.अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कामाला वेग येईल, अशी अपेक्षा होती. त्यांच्या निवडीला १५ दिवस लोटले आहेत. योजना राबविण्याचे दूरच, किमान जिल्हा परिषदेच्या आर्थिक स्थितीचा आढावाही घेण्यात आला नाही. एकीकडे डीबीटीमुळे वैयक्तिक लाभाच्या योजनावरील निधी मोठ्या प्रमाणात अखर्चित राहत आहे. आर्थिक वर्ष संपायला दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे़ त्यामुळे नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षापुढे योजना मार्गी लावण्याचे मोठे आव्हान आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर