गाेदामातील धानाची उचल करणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:09 AM2021-03-06T04:09:18+5:302021-03-06T04:09:18+5:30

कैलास निघाेट लाेकमत न्यूज नेटवर्क देवलापार : राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने रामटेक तालुक्यात सुरू केलेल्या पाचपैकी तीन शासकीय ...

When will you pick up the grain from Gadama? | गाेदामातील धानाची उचल करणार कधी?

गाेदामातील धानाची उचल करणार कधी?

Next

कैलास निघाेट

लाेकमत न्यूज नेटवर्क

देवलापार : राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाने रामटेक तालुक्यात सुरू केलेल्या पाचपैकी तीन शासकीय धान खरेदी केंद्रातील गाेदामे फुल्ल झाल्याने या केंद्रावरील धान खरेदी तात्पुरती बंद केली आहे. तालुक्यातील नाेंदणीकृत १,६०० शेतकऱ्यांकडील धानाचे माेजमाप करावयाचे असल्याने धान खरेदी केंद्र सुरू करणे गरजेचे आहे. त्यासाठी गाेदामांमधील धानाच्या पाेत्यांची उचल करून गाेदाम रिकामे करणेही आवश्यक आहे. परंतु, आदिवासी विकास महामंडळ महिनाभरापासून या गाेदामांमधील धानाची उचल करण्यास दिरंगाई करीत असल्याने, या विभागातील अनागाेंदी कारभार स्पष्ट हाेत असल्याचा आराेप धान उत्पादकांनी केला आहे.

बांद्रा येथील धान खरेदी केंद्र हे एकलव्य आदिवासी आश्रमशाळेत सुरू करण्यात आले असून, काही खाेल्यांमध्ये धानाची पाेती ठेवली आहेत. येथील काही खाेल्या अजूनही रिकाम्या असून, त्या धानाची पाेती ठेवण्यासाठी वापरता येऊ शकतात. या केंद्रावर ६५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी नाेंदणी केली हाेती. यातील केवळ ६२ शेतकऱ्यांकडील धानाची माेजणी करण्यात आली असून, ५८८ शेतकरी प्रतीक्षेत आहेत. या केंद्रावर महिनाभरात केवळ ६२ शेतकऱ्यांकडील धानाची माेजणी करण्यात आली. मग, ५८८ शेतकऱ्यांकडील धान माेजायला किती दिवस लागणार, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

बेलदा (टुयापार) व पवनी येथील धान खरेदी केंद्रांची अशीच अवस्था आहे. शासकीय धान खरेदी केंद्र ३१ मार्चला बंद हाेणार असल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा असल्याने, आदिवासी विकास महामंडळ आगामी २५ दिवसात १,६०० शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी करेल काय, असा प्रश्नही काही शेतकऱ्यांनी उपस्थित केला. शासकीय धान खरेदी बंद झाल्याने व्यापाऱ्यांनी याचा फायदा घेत कमी दरात धानाची खरेदी करायला सुरुवात केली आहे. काहींनी आर्थिक अडचण असल्याने व्यापाऱ्यांना मिळेल त्या दरात धान विकला आहे.

...

धानाचे नुकसान

रामटेक तालुक्यातील १,६०० नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाचे आदिवासी विकास महामंडळाने माेजमाप न केल्याने, त्यांनी घरीच धान साठवून ठेवला आहे. यातील अनेकांकडे धान साठवून ठेवण्यासाठी पुरेशी व सुरक्षित जागा नाही. काहींनी त्यांच्याकडील धान उघड्यावरच ठेवला आहे. त्यामुळे उंदरांनी पाेती कुरतडायला सुरुवात केली असून, धानाची नासाडी हाेत आहे. यात नुकसान शेतकऱ्यांनाच साेसावे लागणार आहे. शासकीय धान खरेदी केंद्र ३१ मार्चला बंद हाेणार असल्याची चर्चा असल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

...

केवळ २,२०० क्विंटल खरेदी

या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धानाची किमान आधारभूत किमतीप्रमाणे (प्रति क्विंटल १,८८६ रुपये) खरेदी केली जात असून, ७०० रुपये प्रति क्विंटल (५० क्विंटलपर्यंत) अतिरक्त बाेनस दिला जात असल्याने, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २,५६८ रुपये भाव मिळताे. शासकीय खरेदी बंद करण्यात आल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून हाच धान १,४०० रुपये ते १,५०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला आहे. यात शेतकऱ्यांना प्रति क्विंटल १,००० रुपये ते १,१०० रुपयांचे नुकसान साेसावे लागत आहे. विशेष म्हणले आदिवासी विकास महामंडळाने या तिन्ही केंद्रावर आजवर केवळ २,२०० क्विंटल धानाची खरेदी केली आहे.

...

मिलिंगला मुद्दाम विलंब

पूर्वी घाेटी येथील केंद्रावर खरेदी केलेला धान पटांगणात उघड्यावर ठेवला जायचा. तिथे धानाची पाेती बेवारस पडून असायची. यावर्षी मात्र आदिवासी विकास महामंडळाने गाेदाम फुल्ल असल्याचे सांगून खरेदी बंद केली आहे. वास्तवात, महामंडळाने धानाच्या खरेदीसाेबतच त्याच्या मिलिंगचीही तातडीने व्यवस्था करायला हवी हाेती. मिलिंगची व्यवस्था उशिरात करण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाली असून, हा प्रकार मुद्दाम घडवून आणला जात असल्याचा आराेप जाणकार शेतकऱ्यांनी केला आहे.

Web Title: When will you pick up the grain from Gadama?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.