महिलांच्या श्रमाला व्यवस्थेत मोल कधी मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:07 IST2021-03-14T04:07:55+5:302021-03-14T04:07:55+5:30
- अरुण लाटकर : जनवादी महिला संघटनेचा वर्धापन दिवस नागपूर : महिलांच्या सहभागाशिवाय समाज पूर्ण होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे ...

महिलांच्या श्रमाला व्यवस्थेत मोल कधी मिळणार
- अरुण लाटकर : जनवादी महिला संघटनेचा वर्धापन दिवस
नागपूर : महिलांच्या सहभागाशिवाय समाज पूर्ण होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे कुठलाही संघर्ष पुढे जाऊ शकत नाही. ही बाब सर्वार्थाने मान्य करण्यात येत असली तरी आजही सामाजिक श्रमाचा ७० टक्के भाग उचलणाऱ्या महिलांच्या श्रमाला या व्यवस्थेत मोल कधी मिळणार, हा प्रश्न असल्याची भावना किसान सभेचे जिल्हा सचिव अरुण लाटकर यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय जनवादी महिला संघटेच्या चाळिसाव्या स्थापनादिनी ते बोलत होते.
महिलांच्या प्रगतीचा कितीही उपयोग करण्यात येत असला तरी आजही शेतकरी मजुरी करणाऱ्या व झोपडपट्टीत राहून अनेकविध कामे करणाऱ्या महिलांमध्ये ८० टक्के भाग हा दलित, आदिवासींचा आहे. त्यामुळे, बाबासाहेब आंबेडकरांच्या कथनानुसार सामाजिक व आर्थिक संघर्ष एकाच वेळी लढण्याची गरज असल्याचेही लाटकर यावेळी म्हणाले. अध्यक्षस्थानी कल्पना हटवार होत्या. सूत्रसंचालन विजया जांभूळकर यांनी केले. याप्रसंगी संघटनेच्या सहसचिव अंजली तिरपुडे, अंजली धारगावे, रंजना पौनिकर, प्रीती मेश्राम, स्नेहलता जांभूळकर, ईश्वरी वाटकर आदींची उपस्थिती होती.
.....