शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 23:44 IST

शासनाने एखाद्या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी निर्माण केलेले अभ्यासगट किती निष्काळजीपणे वागतात याची प्रचिती शिक्षकांना आली आहे. शासनाने खासगी आस्थापनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना केली होती. परंतु वर्षे लोटल्यानंतरही अभ्यासगटाकडून कुठल्याही शिफारशी शासनाला प्राप्त झाल्या नाहीत.

ठळक मुद्दे अभ्यास समिती वर्षभरापासून निष्क्रि य : शासन म्हणते, समितीचा अहवालच नाही तर आदेश कसे काढणार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाने एखाद्या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी निर्माण केलेले अभ्यासगट किती निष्काळजीपणे वागतात याची प्रचिती शिक्षकांना आली आहे. शासनाने खासगी आस्थापनातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी अभ्यासगटाची स्थापना केली होती. परंतु वर्षे लोटल्यानंतरही अभ्यासगटाकडून कुठल्याही शिफारशी शासनाला प्राप्त झाल्या नाहीत. राज्य सरकार पूर्वी शासकीय कर्मचाऱ्यांना दोन कालबद्ध पदोन्नती देत होते. त्यात सुधार करून १०, २० आणि ३० अशी विभागणी करून तीन लाभांची नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू केली. या योजनेचा लाभ खासगी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सोडून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आला.खासगी आस्थापनेतील शिक्षकांनाही लागू करण्यासाठी शिक्षण विभागाने अभ्यासगटाची निर्मिती केली होती. ३१ जुलै २०१९ रोजी यासंदर्भात शासननिर्देश काढण्यात आला होता. शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेत स्थापन करण्यात आलेल्या समितीत शिक्षण संचालक, विद्या प्राधिकरणाचे संचालक आदी सदस्य होते. अभ्यासगटाला तीन महिन्यात अहवाल सादर करायचा होता. शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष हेमंत गांजरे हे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यांनी शिक्षक व क्रीडा विभागाला माहितीच्या अधिकारात शिक्षकांना सुधारितआश्वासित प्रगती योजना कधी लागू होईल, याची माहिती मागितली. त्या अनुषंगे त्यांना कळविण्यात आले की, शिफारशींकरिता लागू करण्यात आलेल्या अभ्यास गटाचा अहवाल अद्यापही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कोणतेही आदेश निर्गमित केले नाहीत.शिक्षकांना मुद्दाम वंचित ठेवण्यात येतेयएका वर्षाचा काळ लोटल्यानंतरही अभ्यासगटाने काहीही केलेले नाही. शासन अभ्यासगट निर्माण करण्याचा केवळ देखावा करीत आहे. अभ्यासगटाला तीन महिन्यात अहवाल सादर करायचा होता. वर्षभरात समितीचा अहवालच आला नाही, विभाग त्या संदर्भात गंभीर नाही, याचाच अर्थ शिक्षकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. अभ्यासगटातील मंडळी अभ्यासच करीत नसेल तर अभ्यासगट स्थापन करून काय फायदा, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर