प्रादेशिक प्रयोगशाळा कधी होणार ?

By Admin | Updated: June 6, 2015 02:05 IST2015-06-06T02:05:05+5:302015-06-06T02:05:05+5:30

वैधमापनशास्त्र विभागाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘प्रादेशिक संदर्भ मानक’ या अद्ययावत प्रयोगशाळेसाठी जागा निश्चित झाली

When will the Regional Laboratory be? | प्रादेशिक प्रयोगशाळा कधी होणार ?

प्रादेशिक प्रयोगशाळा कधी होणार ?

मोरेश्वर मानापुरे ल्ल नागपूर
वैधमापनशास्त्र विभागाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘प्रादेशिक संदर्भ मानक’ या अद्ययावत प्रयोगशाळेसाठी जागा निश्चित झाली असली तरीही मंजुरीसाठी सहा वर्षांचा काळ लोटला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय जागा देण्यावर गंभीर नाही. खासगी लोकांचा जागेवर डोळा असल्यामुळे शासनाचा प्रकल्प सध्या लालफितशाहीत अडकला आहे. नागपुरात नव्याने सुरू होणारी देशातील सहावी प्रयोगशाळा ठरणार आहे.
संदर्भ प्रयोगशाळेसाठी सुमारे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केल्याची माहिती आहे. या संदर्भात वैधमापनशास्त्र विभागाचे उपसंचालक (प्रभावी) ललित हारोडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

१०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित
मिहान प्रकल्पामुळे देशातील नामांकित आणि आंतरराष्ट्रीय स्तराच्या कंपन्या नागपुरात येण्यास उत्सुक आहेत. विभागाची नागपुरात असलेलेली दुय्यम मानक प्रयोगशाळा सिव्हिल लाईन्स येथे असून ती फार जुनाट झाली आहे. यात नवीन आधुनिक उपकरणे नसल्यामुळे काळाच्या ओघात या प्रयोगशाळेचे महत्त्व कमी झाले आहे. मानक २० ते २५ वर्षे जुने आहेत. पत्रव्यवहारानंतर नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी चार जागेपैकी नागपूरपासून अमरावती मार्गावर १७ कि़मी. अंतरावर द्रुगधामना गावापासून अडीच कि़मी. अंतरावर जागेची निवड केली आणि ही जागा संदर्भ प्रयोगशाळेसाठी मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता. यापूर्वीही विभागाने शंकरनगर येथील अंध महाविद्यालयामागे, धनवटे नॅशनल कॉलेजच्या मैदानाजवळ आणि प्रजापती ब्रम्हकुमारीच्या बाजूला मौजा अजनी सर्वे क्र. १० येथील २१ हजार चौरस फूट (.३४ हेक्टर आर) जमिनीची पाहणी करून जागा निश्चित केली होती. पण ही जागा धनवटे नॅशनल कॉलेजने आणि निवृत्त न्यायाधिशांनी निवासी कॉलनीसाठी मागितल्याने या जागेचा प्रस्ताव विभागाने रद्द केला होता.

प्रयोगशाळेमुळे व्यवसायात निश्चितच भर
गुजरातमध्ये इलेक्ट्रॉनिक मीटर आणि हैदराबादेत आॅटोमीटरचा अचूकपणा वैधमापनशास्त्र विभाग बघतो. हे कार्य भविष्यात संदर्भ प्रयोगशाळेत होणार असल्यामुळे, देशातील मोठ्या कंपन्यांचे प्रतिनिधी व अधिकारी नागपुरात येतील. त्यामुळे नागपूरच्या व्यवसायात निश्चितच भर पडेल. याशिवाय फ्लॅटचा एरिया अचूक आहे किंवा नाही तसेच गिट्टी, रेती अचूक वजनांनी ग्राहकांना मिळावी, म्हणून संदर्भ प्रयोगशाळेचा भविष्यात उपयोग होणार आहे.

Web Title: When will the Regional Laboratory be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.