समाज भवनाची समस्या सोडविणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST2021-09-16T04:13:31+5:302021-09-16T04:13:31+5:30
उमरेड : मागील अनेक वर्षांपासून समाज भवनाची समस्या जैसे थे आहे. परिसरात मोठ्या संख्येने आमचा समाज असूनही अद्याप याकडे ...

समाज भवनाची समस्या सोडविणार कधी?
उमरेड : मागील अनेक वर्षांपासून समाज भवनाची समस्या जैसे थे आहे. परिसरात मोठ्या संख्येने आमचा समाज असूनही अद्याप याकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. केवळ राजकारणासाठी वापर करण्यात आला. समाजातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना उपक्रम-कार्यक्रम आदींच्या आयोजनासाठी त्रास सोसावा लागतो. तेव्हा समाज भवनाची समस्या सोडविणार कधी, असा सवाल महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने उपस्थित करण्यात आला.
उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांच्याकडे सदर समस्येकडे लक्ष वेधले गेले. यावेळी युवा आघाडी, महिला आघाडी, सेवा आघाडीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शिष्टमंडळात पंचायत समिती सदस्य पुष्कर डांगरे, जगदीश वैद्य, प्रा. डॉ. प्रमोद लाखे, हरिश्चंद्र दहाघाने, संजय वाघमारे, संजय घुग्घुसकर, ऋषी गवळी, रुपराव गिरडे, नगरसेविका रेणुका कामडी, गीता आगाशे, नंदिनी वासूरकर, मनीषा मुंगले, हर्षा वाघमारे, स्नेहल वैद्य, दत्तू जिभकाटे, श्रावण गवळी, केतन रेवतकर, राकेश नौकरकर, भूमीपाल पडोळे, विकास बालपांडे, मिलिंद वाघमारे, कीर्ती झाडे, हरिश्चंद्र गवळी आदींचा सहभाग होता.