मेडिकलला कधी मिळणार एमआरआय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:08 IST2020-12-02T04:08:21+5:302020-12-02T04:08:21+5:30
बेधुंद वाहन चालकावर कठोर कारवाई व्हावी नागपूर : वाहतूक पोलिसाला धडक देऊन त्याला फरफटत नेणाऱ्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची ...

मेडिकलला कधी मिळणार एमआरआय?
बेधुंद वाहन चालकावर कठोर कारवाई व्हावी
नागपूर : वाहतूक पोलिसाला धडक देऊन त्याला फरफटत नेणाऱ्या वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य राजू वाघ यांनी केली. अशा बेधुंद चालकावर कठोरातील कठोर कारवाई झाल्यास इतरांवर वचक बसेल, असेही वाघ यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.
ॲन्टिजेन चाचण्यांची संख्या मंदावली
नागपूर : नागपूर जिल्ह्यात मध्यवर्ती कारागृहातून रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांना सुरुवात झाली, नंतर या चाचण्यांची संख्या वाढतच गेली. आरटीपीसीआर चाचण्यांच्या तुलनेत ॲन्टिजेन चाचण्यांची संख्या वाढल्याने अनेकांनी यावर आक्षेप घेतला. ॲन्टिजेन चाचण्यांचा अहवाल हा १०० टक्के निगेटिव्ह राहत नसल्याने पुन्हा आरटीपीसीआर चाचण्यांवर जोर देण्यात आला. सोमवारी केवळ ७७१ ॲन्टिजेन चाचण्या झाल्या. यात १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
वंजारीनगर ते टीबी वॉर्ड रस्ता धोकादायक
नागपूर : वंजारीनगर पाण्याच्या टाकीपासून ते टीबी वॉर्डकडे जाणारा रस्ता दुचाकीचालकांसाठी धोकादायक ठरला आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, वाहनचालक यात अडकून पडत आहेत. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांपासून या रस्त्याचे डांबरीकरणच झाले नाही. दर सहा महिन्याने खड्ड्यावर डांबर टाकले जात असल्याने ठिगळांचा रस्ता झाला आहे. धंतोली झोनचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.