कामठी कधी हाेणार डुक्करमुक्त?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:26 IST2020-12-15T04:26:32+5:302020-12-15T04:26:32+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : शहरातील बहुतांश भागात घाण व अस्वच्छतेचे साम्राज्य असून, कचऱ्यासभाेवताल माेकाट जनावरे आणि डुकरांचा सतत ...

When will Kamathi be pig free? | कामठी कधी हाेणार डुक्करमुक्त?

कामठी कधी हाेणार डुक्करमुक्त?

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : शहरातील बहुतांश भागात घाण व अस्वच्छतेचे साम्राज्य असून, कचऱ्यासभाेवताल माेकाट जनावरे आणि डुकरांचा सतत मुक्तसंचार असताे. परिणामी नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असून, हे शहर डुक्करमुक्त हाेणार कधी, असा प्रश्न शहरवासी विचारत आहेत.

राज्यात प्रथम क्रमांकाचे घाणीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामठी शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी नगरपालिकेकडे आहे. शहराच्या स्वच्छतेसाठी पालिकेचा महिन्याकाठी ४५ लाख रुपयांचा खर्च हाेताे. असे असताना शहरावासीयांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत असल्याने नागरिकात संताप व्यक्त हाेत आहे. शहराच्या दैनंदिन साफसफाईसाठी पालिकेने १६० स्थायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, त्यांच्या वेतनावर २५ लाख रुपये खर्च हाेतात. परंतु सफाई कामगार याेग्यरीत्या काम करीत नसल्याने बहुतांश भागात कचरा व घाणीचे ढिगारे पसरले राहतात. यामुळे परिसरात डुकरे व माेकाट जनावरे फिरून घाण पसरवितात. त्यामुळे शहरात साथीचे आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहराच्या स्वच्छतेसाठी २०१५ मध्ये नगरपालिकेने कंत्राटदार नियुक्तीचा निर्णय घेतला. संबंधित कंत्राटदार सर्व प्रभागातील रस्ते, नाल्यांची साफसफाई, घंटागाडीद्वारे कचरा संकलन व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. यासाठी अमरावती येथील श्री नागरिक सेवा संस्थेला कंत्राट दिले असून, शहराच्या स्वच्छतेसाठी त्यांना महिन्याला २० लाख रुपये दिले जातात. मात्र या कंत्राटदार संस्थेचे कर्मचारी याेग्यरीत्या साफसफाई करीत नसल्याने शहरात घाण व कचरा विखुरलेला दिसून येताे.

यासंदर्भात मुख्याधिकारी संदीप बाेरकर यांच्याशी चर्चा केली असता, घाण व अस्वच्छतेच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी, कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. याबाबत चाैकशी करून कामचुकारपणा करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: When will Kamathi be pig free?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.